Poultry Workshop esakal
नाशिक

Poultry Workshop : जाणून घ्या करार पद्धतीने गावरान अंडी कुक्कुटपालन, व्यवसाय संधी!

सकाळ वृत्तसेवा

Special Workshop : गावरान अंडी खाण्याकडे ग्राहकांचा वाढता कल आहे. ही बाब लक्षात घेतली तर हा व्यवसाय करार पद्धतीने करून स्टार्टअपलाही संधी आहेत. करार पद्धतीमध्ये अंडी देणारे पक्षी मिळण्यापासून त्यांचे निवारा, खाद्य पाणी व्यवस्थापन, लसीकरण इ.सर्व गोष्टींसाठी सहाय्य तसेच उत्पादित केलेल्या अंड्यांना हमखास मार्केट उपलब्ध होऊ शकते.

आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी हा उत्तम व्यवसाय ठरू शकतो. कमीत कमी पाचशे पक्ष्यांपासून हा व्यवसाय सुरू करण्यापासून ते मोठ्या स्तरावर कसा वाढवावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन करणारी एकदिवसीय कार्यशाळा रविवारी (ता.१६) सकाळ- ॲग्रोवन संलग्न शैक्षणिक संस्था एसआयआयएलसीतर्फे नाशिक सातपूर सकाळ कार्यालयात आयोजिली आहे. (Special Workshop: Learn how to contract Gavran egg poultry farming business opportunities nashik news)

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

चौकटीत दिलेल्या विषयांबरोबरच चिकण व अंड्यांचे विक्री व्यवस्थापन, अंड्यांची हमीभावात खरेदी, पोल्ट्री यशस्वी करण्याची सूत्रे, इ.विषयी या विषयातील अनुभवी वक्ते मार्गदर्शन करतील.

कार्यशाळेतील विषयः

- लेअर कुक्कुटपालनाचे महत्त्व

-विकसित पक्ष्यांच्या विविध जाती, उपजाती

- पक्ष्यांचे शेड, लिटर, पाणी व खाद्य व्यवस्थापन

- औषध व लसीकरण व्यवस्थापन

- व्यवसायाचे अर्थशास्त्र- भांडवली गुंतवणूक

- व्यवसायाचा प्रकल्प आराखडा

कार्यशाळा वार व दिनांक : रविवार, ता.१६ एप्रिल २०२३

ठिकाण : सकाळ कार्यालय, सातपूर एमआयडीसी, त्र्यंबक रोड, नाशिक

वेळ : सकाळी १० ते सायंकाळी ५

शुल्क : प्रति व्यक्ती १५०० रुपये (जेवण व डिजिटल प्रमाणपत्रासह)

नावनोंदणीसाठी संपर्क- ९२८४७ ७४३६३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Spare Parts Price: आधी सोनं-चांदी उच्चांकी, आता वाहन खर्चही गगनाला भिडला; टायर्स आणि गाड्यांच्या सुटे भागांचे दर वाढले

Horoscope : आजपासून गुप्त नवरात्र सुरू! 'या' 4 राशीच्या लोकांचे भाग्य उजळणार; अचानक मिळतील पैसे, मिळेल मोठं सरप्राइज, इच्छापूर्ती योग

कलर्स मराठीकडून सुरज चव्हाणला 'BBM 6'चं आमंत्रण; रीलस्टार घरात जाणार? उत्तर देत म्हणाला- बोलावलंय तर...

U19 World Cup: १८ षटकार अन् २९ चौकार... दक्षिण आफ्रिकेच्या यंगिस्तानचा मोठा पराक्रम; स्पर्धेत गाठला नवा उच्चांक

Seized Vehicles: पोलीस ठाणे, पोलीस यार्ड आणि रस्त्यांवरील जप्त वाहनांचा ढिगारा हटवा; राज्य सरकारचा मोठा आदेश, डेडलाईन काय?

SCROLL FOR NEXT