speed breaker esakal
नाशिक

Nashik News : सकाळ सर्कलसह शहरातील 28 ब्लॅक स्पॉटवर गतिरोधक बसविणार

विक्रांत मते

नाशिक : औरंगाबाद महामार्गावरील हॉटेल मिरची चौकात ऑक्टोबर महिन्यात घडलेल्या बस अपघातानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने अपघाताचे ब्लॅक स्पॉट बंद करण्याच्या सूचना दिल्या. त्याअनुषंगाने रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत २८ ब्लॅक स्पॉट निश्चित करून तेथे गतिरोधक टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्याअनुषंगाने महापालिकेकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. (Speed ​​breakers will installed at 28 black spots in city including Sakal Circle Nashik News)

ऑक्टोबर महिन्यात औरंगाबाद महामार्गावरील हॉटेल मिरची चौकात ट्रॅव्हल्स बसला अपघात झाला. अपघातात अनेकांना प्राणाला मुकावे लागले. त्यानंतर शहरातील विविध अपघात स्थळांचे सर्वेक्षण करून उपाययोजना करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या. अपघाताच्या ठिकाणी सुविधा पुरवताना दृश्य मानतेला महत्त्व देण्याच्या स्पष्ट सूचना होत्या.

त्या अनुषंगाने रिझीलीएंट इंडिया कंपनीमार्फत अपघात स्थळांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्यात आला. मात्र, त्यानंतर अद्यापही २८ अपघात स्थळांच्या जागेवर व्यवस्था करण्यात आली नाही. विभागप्रमुखांच्या बैठकीत आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी २८ ब्लॅक स्पॉटवर गतिरोधक बसविण्याच्या सूचना दिल्या. त्या अनुषंगाने बांधकाम विभागाकडून कारवाई केली जाणार आहे.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

येथे बसविणार गतिरोधक

त्र्यंबक रोडवरील सकाळ सर्कल परिसरात दोन्ही बाजूने वेगाने वाहने येतात. त्यामुळे अनेकदा अपघाताला सामोरे जावे लागते. त्या पार्श्वभूमीवर सकाळ सर्कल चौकात गतिरोधक बसविले जाणार आहे. त्याचबरोबर मिरची हॉटेल सिग्नल, तारवालानगर सिग्नल, एक्स्लो पॉइंट, गडकरी चौक सिग्नल, एमआयडीसी सातपूर, कार्बन नाका, सीबीएस, सिद्धिविनायक चौक, शरणपूर रोड सिग्नल, वेद मंदिर चौक, एबीबी सिग्नल, शरणपूर रोड सिग्नल, बळी मंदिर, रासबिहारी शाळा चौफुली, शिंदेगाव शिवार, द्वारका सर्कल, फेम टॉकीज सिग्नल, राऊ हॉटेल सिग्नल, के. के. वाघ महाविद्यालय सिग्नल, जत्रा हॉटेल चौफुली, उपनगर नाका सिग्नल, चेहेडी गाव फाटा, दत्तमंदिर सिग्नल, पळसे बस स्टॉप, आडगाव ट्रक टर्मिनल, तपोवन क्रॉसिंग, स्वामिनारायण चौफुली, जुना गंगापूर नाका, नांदूर नाका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यात ढोल ताशा पथकातील सदस्याकडून महिला पत्रकाराचा विनयभंग, सहकाऱ्यालाही मारहाण; दोघांविरोधात गुन्हा दाखल

US OPEN 2025 Prize Money : कार्लोस अल्कराजला बक्षीस म्हणून किती रुपये मिळाले? IPL विजेत्या, उपविजेत्यांच्या एकूण रकमेपेक्षाही अधिक

अजय देवगणचा ‘धमाल’ प्रदर्शनासाठी सज्ज, रितेश-अर्शद-जावेदची धमाल तिकडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला, पोस्टर व्हायरल

Gold Rate Today : पितृपक्षाच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या भावात बदल; खरेदीची उत्तम संधी? जाणून घ्या आजचा ताजा भाव

North India Flood : अतिवृष्टीचा कहर ! अनेक राज्यांत पूरस्थिती, हजारो गावे बुडाली; लाखो हेक्टर शेतीचे नुकसान, आजही पावसाचा अलर्ट

SCROLL FOR NEXT