gutkha speedbreaker.jpg 
नाशिक

गुटखा खाणाऱ्यांनो.."महामार्गवरील गतिरोधक तरी सोडा हो..."

प्रशांत पवार : सकाळ वृत्तसेवा

नाशिक / सौंदाणे : येथे थुंकू नये, थुंकण्यास सक्त मनाई आहे, थुंकल्यास दंड आकारला जाईल, अशा आशयांच्या सूचना अनेक शासकीय, प्रशासकीय कार्यालयांमध्ये, सार्वजनिक इमारती यांसारख्या ठिकाणी मध्यपान, धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींसाठी महत्त्वाच्या सूचना लिहिलेल्या असतात. परंतु आता अशीच वेळ राष्ट्रीय महामार्गाच्या गतिरोधाकांजवळ लिहिण्याची वेळ सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्रशासनावर येऊन ठेपली आहे. 

सौंदाणे परिसरातील गतिरोधक गुटख्याने होताय लालबुंद 
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मालेगावपासून नाशिकपर्यंत महामार्गालगत जी मोठी गावे आहेत, तसेच त्या गावांना उड्डाणपूल नाहीत अशा गावांच्या प्रमुख ठिकाणी रस्ता दुभाजक ठेवले आहेत. जेणेकरून तेथील लोकांना व इतर गावातील लोकांना, शाळकरी मुलांना रस्ता ओलांडण्यासाठी मदत होईल. महामार्गावरील दुभाजकावर गतिरोधक टाकले आहेत. अपघात होऊ नये म्हणून हे गतिरोधक असल्याने त्यांचा वापर हा वाहनांची गती कमी करण्यासाठी केला जातो. परंतु आता त्याचा वापर वाहनचालक हे गुटखा, तंबाखू, पान खाऊन थुंकण्यासाठी करीत असल्याने ते लाल रंगाने रंगत असल्याचे दिसत आहे.

गुटख्याच्या पिचकरीने रंगताय गतिरोधक 

खालेला गुटखा थुंकण्यासाठी चालक हा वाहनाचा वेग कमी होताच वाहनाचा दरवाजा वा काच उघडून कसरत करताना दिसतात. त्यांच्या अशा थुंकण्याच्या कसरतीमुळे चालकासोबतच प्रवाशांचाही जीव धोक्‍यात घालण्याचे काम होत असल्याचे चित्र आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder: 1 ऑक्टोबरपासून 'एलपीजी'बाबतच्या नियमांमध्ये मोठे बदल; 'या' ग्राहकांना मिळणार नाही लाभ

Latest Marathi News Live Update : आदित्य ठाकरेंचा शेतात लाइट लावून शेतकऱ्यांशी संवाद

Dharashiv News : आदित्य ठाकरे, अंबादास दानवे यांनी धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा केला पाहणी दौरा; शेतकऱ्यांनी अत्यंत पोटतिडकीने आपल्या व्यथा मांडल्या

Police Commissioner Amitesh Kumar : ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई; वेळेपेक्षा भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य

Karad Ganpati Visarjan : कऱ्हाडच्या मिरवणुकीत दिसली बदलाची चाहूल; डीजेच्या दणदणाटापेक्षा वाद्यांचा गजर, गुलालएेवजी खुलला भक्तीचा रंग

SCROLL FOR NEXT