Summer Drinks esakal
नाशिक

Summer Season: नाशिककरांना थंड करण्यासाठी दररोज 12 टन बर्फ खर्ची! उन्हाचा पारा वाढताच मागणी वाढली

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्ह्याचा पारा ३५ अंश सेल्सिअसवर पोचल्याने उन्हाच्या झळा चांगल्याच जाणवत आहेत. भर दुपारी बर्फ गोळा, उसाचा रस किंवा विविध फळांचे ज्यूस घेऊन उन्हाची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न होतो.

त्यामुळे गोळा किंवा ज्यूस बनवण्यासाठी उपयोगी ठरणाऱ्या बर्फाच्या मागणीत वाढ झाली असून, नाशिकमधील वेगवेगळ्या ‘आईस’ फॅक्टरीतून दिवसाला सुमारे १२ टन बर्फ तयार होतो. या बर्फामुळेच नाशिककर थंड होत असल्याचे दिसून येते. (spend 12 tonnes of ice per day to cool them Demand increased as mercury rose in summer Season nashik news)

उन्हाळा सुरू झाला, की गारेगार कुल्फी, बर्फाचा गोळा, फळांचे ज्यूस आणि उसाचा रस यांच्या मागणीत वाढ होते. हे पदार्थ बनवताना बर्फाचा वापर होतो. त्यामुळे बर्फाच्या मागणीत आपोआप वाढ होते. नाशिकमध्ये साधारणतः सहा बर्फ बनविणाऱ्या कंपन्या आहेत.

एका कंपनीत साधारणतः दीड ते दोन टन बर्फ सकाळ व सायंकाळ सत्रात बनतो. बर्फाच्या एक लादी ५० किलोची असते. सद्यःस्थितीत १५० किलोच्या लादीचा भाव हा ८०० रुपये आहे. मागील वर्षी हा दर ६०० रुपये होता. यंदा दरातही वाढ झाल्याचे दिसून येते. त्याचा परिणाम बर्फ गोळा, ज्यूस व उसाच्या रसावर झाला आहे.

सरबताचे प्रकार व दर प्रतिग्लास

अननस ज्यूस : ४० रुपये
मोसंबी ज्यूस : ४० रुपये
लिंबू सरबत : २० रुपये
चॉकलेट ज्यूस : ४० रुपये
गुलाबी ज्यूस : ४० रुपये
आईस गोळा प्लेट : ५० रुपये
अननस मिल्कशेक : ४० रुपये
कालाखट्टा : ४० रुपये
कच्चीकैरी : ४० रुपये
ऑरेंज : ४० रुपये
गुलाब फ्लेवर गोळा : २० रुपये
चॉकलेट प्लेवर गोळा : २० रुपये
उसाचा रस : सरासरी २० रुपये

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

आईस क्यूबला पसंती

हॉटेलमध्ये मिळणाऱ्या बर्फाच्या गुणवत्तेविषयी साशंकता असल्याने आता आईस क्यूबला पसंती वाढली आहे. साधारणतः १० रुपये किलो दराने हा बर्फ मिळतो. काही हॉटेल चालकांनी स्वतःच्या फ्रीजमध्येच आईस बनवायला सुरवात केली आहे. त्यामुळे हॉटेलमध्ये सध्या आईस क्यूबला सर्वाधिक पसंती दिसून येते.

"गोळ्याचे विविध प्रकारांना युवकांची पसंती मिळते. यात आईस गोळा प्लेट, काला खट्टासह वेगवेगळ्या प्लेव्हरचे गोळे आमच्याकडे मिळतात. त्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे."

- राजू शहा, गोळे विक्रेता, कॉलेज रोड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramdas kadam : रामदास कदम यांचा आणखी एक खळबळजनक दावा, थेट उद्धव ठाकरेंना आव्हान

Crime News : गोळीबार प्रकरण: पंचवटी पोलिसांकडून १४वा संशयित जेरबंद, आतापर्यंत माजी नगरसेवकासह १४ अटकेत

World Cup 2025: भारताविरुद्ध पाकिस्तानने टॉस जिंकला, प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल; हस्तांदोलन झालं की नाही?

Sangli Accident Death : काम संपवून घरी निघाला होता, समोरू दुचाकी आली अन् दोघेही जाग्यावर संपले; सांगलीतील घटना

Latest Marathi News Live Update:परबांनी बिल्डरांकडून मर्सिडीज घेतली की नाही, नार्को टेस्टही हवी : रामदास कदम

SCROLL FOR NEXT