नाशिकमध्ये प्रथमच स्पाइन क्लिनिक sakal
नाशिक

नाशिकमध्ये प्रथमच स्पाइन क्लिनिक

उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांची मुंबईवारी थांबणार

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मणक्यांच्या आजारासंबंधीच्या सर्व शस्त्रक्रियांसाठी आता उत्तरमहाराष्ट्रातील रुग्णांना मुंबई जाण्याची गरज पडणार नाही. नाशिक येथील सुश्रुत रूग्णालयात आता ‘स्पाईन क्लिनिक ची सुरवात करण्यात आली. या क्लिनिकचे उद्‌घाटन शनिवारी (ता.११) विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. अमनदीप गुजराल, सुधीर मुतालिक, रंजना पाटील, मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार, डॉ. प्राची पवार, डॉ. अनिकेत शहा, डॉ. एल.पी.चौधरी, नितीन कोल्हे आदी उपस्थित होते. सृश्रृत रुग्णालयातील स्पाईक क्लिनिकमध्ये मुंबई येथील नानावटी हॉस्पिटलमधील निष्णात डॉ.अमनदीप गुजराल हे आठवड्याच्या प्रत्येक सोमवार व मंगळवारी उपस्थित राहून रुग्णांची तपासणी व शस्त्रक्रिया करणार आहे. यावेळी त्यांनी बोलताना मणक्याच्या आजारांसंबंधी असलेली शस्त्रक्रिया बाबत माहिती देत आता ही शस्त्रक्रिया तंत्रज्ञानामुळे अतिशय सोपी झाली असून यात रुग्ण शस्त्रक्रियानंतर दुसऱ्या दिवशी चालू शकणार आहे.

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी देखील यावेळी मार्गदर्शन करत नाशिकमधील अशा प्रकारचे हे प्रथमच क्लिनिक असून रुग्णांची यामुळे होणारी गैरसोय नक्कीच टळणार आहे. मणक्याच्या आजरासंबंधीच्या समस्या वाढत असल्याने रूग्णालयाच्या माध्यमातून चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. डॉ. प्राची पवार म्हणाल्या की, रुग्णांना अतिशय कमी दरामध्ये या आजाराचे निदान करून देण्याचा आमच्या रूग्णालयाचा मानस आहे. यावेळी रुग्णालयाचे कर्मचारी, शस्त्रक्रिया करण्यात आलेले रुग्ण उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 World Cup: झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने केला मोठा बदल; मॅच विनर खेळाडू संघात सामील

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Latest Marathi News Update : महाशिवरात्रीला बोकड कापल्याने ग्रामस्थ आक्रमक, जालना महामार्गावर ठिय्या आंदोलन; २ तास वाहतुकीचा खोंळबा

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

SCROLL FOR NEXT