While felicitating meritorious students, Principal C. B. Cultivators and teachers
While felicitating meritorious students, Principal C. B. Cultivators and teachers esakal
नाशिक

SSC Result : येवल्याचा दहावीचा निकाल 94 टक्के; गुणवत्तेत 3 टक्क्यांनी घट

सकाळ वृत्तसेवा

SSC Result : मागील वर्षी शाळा तेथे परीक्षा केंद्र असल्याने निकालाच्या आकड्यांनी उड्डाणे घेतली होती. यंदा मात्र हे उड्डाणे पुन्हा खाली आले.

तालुक्याचा एकत्रित निकाल तीन टक्क्यांनी घटला आहे, तर गेल्या वर्षीच्या तुलनेत विशेष प्रावीण्यात देखील ५०० विद्यार्थी संख्या घटली आहे. यंदा २५० विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. (ssc 10th pass result 94 percent 3 percent decline in quality nashik news)

तालुक्यातील ५० हून अधिक माध्यमिक विद्यालयातून ४ हजार ४४८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून यातील ४ हजार १९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर १ हजार ९५३ विद्यार्थी (मागील वर्षी २ हजार ४५३) विशेष प्रावीण्यासह (डिस्टिंक्शन) उत्तीर्ण झाले आहेत.

तर १ हजार ५०४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. तब्बल १३ शाळांचा निकाल १०० टक्के लागला असून फक्त २५० जण अनुत्तीर्ण झाले आहे. पूर्वीप्रमाणेच केंद्रांवर परीक्षा झाल्याने यावेळी अभ्यासाला तितकेच महत्त्व आले.

अर्थात बेस्ट ऑफ फाईव्हमुळे छप्पर फाडके गुण मिळाले आहेत. तालुक्यातून तब्बल दोनशेवर विद्यार्थ्यांनी गुणांची नव्वदी पार करून ९७ टक्क्यांपर्यंत झेप घेतली आहे. तालुक्याचा दहावीचा सरासरी निकाल २०१६ मध्ये ९२ तर २०१९ मध्ये ८८.६० व २०२० मध्ये ८९.३३ टक्के लागला होता.

२०२१ मध्ये परीक्षाच न झाल्याने ४८ शाळांचा १०० टक्के निकाल लागला होता. २०२२ मध्ये शाळांचा तालुक्याचा सरासरी ९७ टक्के निकाल लागला होता यात यात यंदा तीन टक्के घट होऊन ९४.३७ टक्के लागला आहे.

सर्वच विद्यार्थ्यांचे गुणपत्रक गुणांनी भरल्याने विद्यार्थ्यांचा अकरावी विज्ञान शाखेकडे सर्वाधिक कल असणार आहे. वाणिज्य व कला शाखेकडे सुमार ओढा आहे. पॉलिटेक्निककडे अनेक विद्यार्थ्यांचा ओढा असून अनेकांनी सुट्टीतच महाविद्यालये देखील निवडल्याचे चित्र आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तालुक्यातील विद्यालयांचा निकाल असा (कंसात टक्केवारी) : मातोश्री चव्हाण विद्यालय अंदरसूल (८६), समता विद्यालय सुरेगाव (९८.१४), न्यू इंग्लिश स्कूल उंदिरवाडी (९३), जनता विद्यालय गवंडगाव (१००), मुक्तानंद विद्यालय बोकटे (८६), माध्यमिक विद्यालय बल्हेगाव (१००), जनता विद्यालय देशमाने (१००),

जनता विद्यालय मुखेड (९४.५९), विवेकानंद विद्यालय एरंडगाव (९९), न्यू इंग्लिश स्कूल नगरसूल (९४.९५), मा. वि. विद्यालय राजापूर (९६.५३), नूतन विद्यालय ममदापूर (९०), (स्व.) पवार विद्यालय धुळगाव (९४.२३), पुण्यश्लोक विद्यालय अनकाई (१००), संतोष विद्यालय बाभूळगाव (९८.७८),

म.फुले विद्यालय कुसूर (१००), भुलेश्वर विद्यालय भुलेगाव (१००), जनता विद्यालय पाटोदा (९०.६१), माध्यमिक विद्यालय तांदूळवाडी (८५.४५), न्यू इंग्लिश स्कूल सावरगाव (९४.६४), संत ज्ञानेश्वर विद्यालय कातरणी (८८.८८),

सा.फुले विद्यालय सोमठाण देश (९५), जय योगेश्वर विद्यालय शिरसगाव (९२.१८), आदर्श विद्यालय चिचोंडी (९२.५९), राजा शिवाजी विद्यालय ठाणगाव (८८.४६), मुक्तानंद विद्यालय येवला (९२.८७), एन्झोकेम हायस्कूल येवला (९२.८२), जनता विद्यालय येवला (८६.२७), ॲग्लो ऊर्दू येवला (९७.६७),

गर्ल्स उर्दू येवला (९६.३४), न्यू इंग्लिश स्कूल तळवाडे (९४.२३), संतोष विद्यालय रहाडी (९१), न्यू इंग्लिश स्कूल भारम (८८), सरस्वती विद्यालय सायगाव (९८.४०), गुरुदत्त विद्यालय धामोडे (१००), धामणगाव विद्यालय (८०.६४),

सरस्वती विद्यालय खरवंडी (९६.६६), जनता विद्यालय अंगणगाव (९३.९३), जनता विद्यालय कुसमाडी (९७.५६), जनता विद्यालय निमगाव मढ (९४.२८), नगरसूल आश्रमशाळा (१००), संत जनार्धन सावरगाव (९१.३०), एसएनडी इंग्लिश मीडियम बाभूळगाव (९९.४३),

डी. पॉल. स्कूल (१००), शासकीय वसतिगृह बाभूळगाव (८७.५०), मातोश्री सोनवणे स्कूल व इंग्लिश मीडियम (१००), आत्मा मलिक पुरणगाव (१००), मातोश्री इंग्लिश मीडियम अंदरसूल (१००), गणाधिस राजापूर (१००) टक्के निकाल लागला आहे.

"अध्ययन-अध्यापनात अद्ययावत पद्धती व तंत्रज्ञानाचा वाढलेला वापर, विद्यार्थ्यांची व पालकांची सजगता या कारणामुळे निकाल वाढला आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही जमेची बाजू आहे. स्पर्धा वाढल्याने प्रत्येक शाळेने व शिक्षकांनी गुणवत्ता जोपासण्याची गरज आहे."

- प्रमोद पाटील, सरचिटणीस शिक्षण प्रसारक मंडळ, नगरसू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

IPL 2024 RCB vs CSK Live Score: चेन्नईला दुसरा धक्का! कर्णधारापाठोपाठ डॅरिल मिचेलही आऊट

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT