Avinash More
Avinash More esakal
नाशिक

SSC Result Success : रसवंतीगृह चालवून कुटुंबाला हातभार लावणाऱ्या अविनाशने दहावीच्या परीक्षेत मिळविले यश

मुकुंद भडांगे

SSC Result Success : घराचं छप्पर गरीबीचं असलं की काम करण्यासाठी कोणत्याही प्रेरणेची गरज पडत नाही, असं म्हणतात. परिस्थितीचे चटके शांत बसू देत नाहीत.

मग छोटे मोठे कामे करत मेहनतीचे टाके टाकत कुटुंब सावरण्यासाठी धडपडणाऱ्या वडिलांना छोटासा हातभार लावण्यासाठी रसवंतीगृह चालविणाऱ्या अविनाशने दहावीत ६२.८०% मार्क्स मिळवत कुटुंबात आनंदाचा गोडवा तयार केला आहे. (SSC Result Success Avinash running sugarcane juice shop succeeded in 10th exam nashik news)

कोकणगाव ( ता. निफाड ) येथील सुनील मोरे यांची परिस्थिती जेमतेम आहे. कुटुंब चालविण्यासाठी ते रिक्षा चालवितात. तर कुटुंबासाठी छोटस चहाचे दुकान त्यांनी सुरू केलेलं आहे.

हे दुकान आई .. आणि मुलगा अविनाश आणि मुलगी .... यांपैकी वेळ मिळेल तसं सांभाळतात. भावंडांपैकी अविनाश हा मोठा आहे. वडिलांचे कष्ट अविनाशने बघितलेले आहेत. तो कोकणगाव येथील छत्रपती शिवाजी विद्यालय शिक्षण घेऊन दहावीचा अभ्यास सांभाळून अविनाशने दुकान सांभाळले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सकाळी ७ ते ११ दुकान सांभाळून तो त्यांनतर शाळेत शिकण्यासाठी जात असे. शाळेतून आल्यानंतर पुन्हा वडिलांना मदत करतो .कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्याने दहावीच्या परीक्षेनंतर रसवंतीगृह सुरू केले आहे.

दररोज तो या रसवंतीगृहात कष्ट करून कुटुंबासाठी मेहनत करतो. परिस्थितीची जाणीव ठेवून जिद्दीने अभ्यास करत अविनाशने५०० पैकी ३१४ गुण मिळवले . अविनाश ला पोलीस बनण्याचे स्वप्न आहे

आज (दि. ०२) निकाल लागल्यानंतर देखील त्याने रसवंतीगृहावर उभे राहणे पसंत केले आहे. त्याच्या या यशाचे कोकणगाव करांनी स्वागत केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shrirang Barne: "अजितदादांच्या काही कार्यकर्त्यांनी माझा प्रचारच केला नाही"; श्रीरंग बारणेंची खदखद

PM Modi: PM मोदींचा राजकीय वारस कोण? अनेक दिवसांपासून सुरू होता वाद

Mumbai Indians: 'निराशाजनक सिजन होता, पण...', नीता अंबांनीचा मुंबईच्या कामगिरीबद्दल बोलताना रोहित-हार्दिकलाही खास मेसेज

Latest Marathi News Live Update: ठाणे जिल्ह्याचा बारावीचा निकाल 92.08 टक्के..

Loksabha Election: महाराष्ट्र सर्वात मागे, लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाची आकडेवारी समोर

SCROLL FOR NEXT