Rajendra More, Deepak Kothmire, Prashant Raut etc. while taking action to cut the tap. esakal
नाशिक

Nashik News : पाथर्डीत थकबाकीदारांच्या नळजोडणी तोडण्यास प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा

इंदिरानगर (जि. नाशिक) : वारंवार सूचना आणि नोटीस देऊनदेखील घर आणि पाणीपट्टी थकबाकी न भरणाऱ्या ग्राहकांच्या जोडणी तोडणीच्या मोहिमेला पाथर्डी गाव परिसरात सुरवात करण्यात आली. (Starting to cut taps of defaulters in non tax payers Nashik News)

हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

उपायुक्त अर्चना तांबे आणि सिडको विभागीय अधिकारी डॉ. मयूर पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पाथर्डी उपविभागीय कार्यालयातर्फे घर आणि पाणीपट्टी थकबाकीदारांची जप्ती मोहीम, सूचना पत्रक नोटीस तथा तगादा लावण्यात येत आहे.

नागरिकांनी घरपट्टी आणि पाणीपट्टी भरण्याबाबत मनपास सहकार्य करावे, असे या वेळी आवाहन करण्यात आले. सूचना, नोटिसा देवूनही थकबाकीदार भरणा करत नसतील अशा थकबाकीदारांच्या नळजोडणी तोडण्यात आल्या.

नागरिकांना भरणा करण्यासाठी मनपाचे सर्व भरणा केंद्र सुटीच्या दिवशीही सुरू राहतील, असे नागरिकांना कळवण्यात आले. मोहिमेत पाथर्डी उपविभागीय कार्यालयाचे प्रभारी निरीक्षक राजेंद्र मोरे, वरिष्ठ भाग लिपिक दीपक कोथमिरे, प्रशांत राऊत, साजिद शेख आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Care : कोण म्हंटल माधुरी हत्तीचा विषय शांत झालाय, वनताराची टीम पुन्हा नांदणीत; आजच्या बैठकीत काय घडलं?

Jalgaon News : जळगाव महापालिकेत लाचखोरीचा पर्दाफाश; लिपिक व समन्वयक एसीबीच्या जाळ्यात

Rain-Maharashtra Latest Live News Update: ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्प- ईसापुर धरण पाणी पातळी वाढ

Rajiv Gandhi : अन् राजीव गांधी मुंबईतून गेले ते कायमचेच! राजभवनातील माजी अधिकाऱ्याने सांगितली शेवटच्या भेटीची आठवण

Beed Crime: सुरेश धस यांचे कार्यकर्ते आहोत, असं म्हणत एकाला बेदम मारहाण; शिरुरमध्ये नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT