Onion News esakal
नाशिक

Nashik Onion News : कांद्यावरील निर्यातबंदी उठवा अन्यथा ‘रास्ता रोको’

कांदा निर्यातबंदीप्रश्नी राज्य शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Onion News : कांदा निर्यातबंदीप्रश्नी राज्य शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. कांद्यावरील निर्यातबंदी तातडीने उठवा अन्यथा राज्यभरात ‘रास्ता रोको’, ‘रेल रोको’ यांसारखे तीव्र आंदोलन करण्याचा थेट इशारा राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिला आहे. (state farmers association has become aggressive on issue of ban on onion exports nashik news)

कांद्याचे बाजारभाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने ७ डिसेंबरला कांद्याची निर्यातबंदी केल्याने सरासरी तीन ते साडेतीन हजार आणि जास्तीत जास्त चार हजार रुपयांपर्यंत असलेले कांद्याचे दर एक हजार रुपयांच्या जवळपास आल्याने राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे पाच ते दहा हजार कोटींचे नुकसान झाले.

देशांतर्गत मागणीच्या तुलनेत सोलापूर, पुणे, नगर आणि नाशिक या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत आहे. कांद्याला सरासरी ५०० ते सातशे रुपये दर मिळत आहे. काही बाजार समित्यांमध्ये आवक वाढविल्याचे दाखविण्यासाठी हजार ते अकराशे रुपयांचा फसवा दर मिळत आहे.

कांदा निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान थांबविण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने कांद्यावरील निर्यातबंदी उठवावी अन्यथा राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना राज्यभरात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सोबत घेऊन रास्ता रोको, रेल रोको यांसारखे तीव्र आंदोलन करेल, असे श्री. दिघोळे यांनी सांगितले.

''ग्राहकांना स्वस्तात कांदा उपलब्ध व्हावा, यासाठी केंद्र सरकारने कांद्याची निर्यातबंदी केली आहे. त्याचा थेट परिणाम द्राक्षाच्या बाजारभावावर होत आहे. कांदा निर्यातबंदीमुळे जास्तीच्या दराने बांगलादेशाला कांद्याची खरेदी करावी लागत आहे.

अतिरिक्त पैसे द्यावे लागत असल्याने ही वसुली बांगलादेशाकडून द्राक्षावर आयात ड्यूटीच्या माध्यमातून वसूल केली जात आहे. बांगलादेशातील व्यापाऱ्यांकडून कमी दराने द्राक्षाची खरेदी केली जात असून, कांदा उत्पादकांचा द्राक्ष उत्पादकांना केंद्र सरकारच्या धोरणाचा आर्थिक फटका बसत आहे.''- गणेश निंबाळकर, जिल्हाप्रमुख, प्रहार संघटना, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KYV Process: वाहनधारकांना मोठा दिलासा! FASTag नियमात महत्त्वाचा बदल; डिजिटल टोल व्यवस्थेत सुधारणा

Video Viral: आईsss शप्पथ... हा तर स्विंगचा किंग! याच्या गोलंदाजीचा सामना करताना भल्याभल्यांना फुटेल घाम...

'बिग बॉस मराठी ६' मध्ये होणार 'या' अभिनेत्रीची एंट्री; रितेश देशमुखसोबत केलंय काम; कोण आहे ती?

Dhule Municipal Election : धुळ्यात मतदानापूर्वीच भाजपचा गुलाल! दोन महिला उमेदवार बिनविरोध; विरोधकांना मोठा धक्का

Narayangaon Protest : जीवघेणी बेकायदेशीर ऊस वाहतूक कधी थांबणार; डिसेंबर महिन्यात दोन महिलांचा मृत्यू; धनगरवाडी येथे रास्ता रोको आंदोलन!

SCROLL FOR NEXT