Maharashtra Public Service Commission esakal
नाशिक

Public Service Commission : चाचणीनंतर चार तासांतच निकाल

उमेदवारांना सुखद धक्का; राज्य लोकसेवा आयोगाची गतिमान कामगिरी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : राज्य शासनाच्या सेवेतील पोलिस शिपाई, पोलिस नाईक, पोलिस हवालदार आणि सहायक पोलिस उपनिरीक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांना पोलिस उपनिरीक्षक पदांसाठीच्या शारीरिक चाचणी नंतर चार तासांतच चाचणीचा निकाल हाती मिळाला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गतिमान काम करत उमेदवारांना प्रतिक्षा करण्याची संधी न देता निवड यादी व सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली आहे.

पोलिस उपनिरीक्षक पदांसाठीच्या २५० पदांवर पदोन्नती देण्याकरीता विभागीय स्पर्धा परीक्षेतील १०३१ उमेदवारांची शारीरिक चाचणी २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित पद्धतीने घेण्यात आली होती. पुणे केंद्रावर प्रतिदिन सुमारे २५० उमेदवारांचा शारीरिक चाचणी कार्यक्रम पूर्ण करून आज (ता.२) त्वरीत प्रस्तुत परीक्षेची तात्पुरती निवड यादी व सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केले आहे.

उपनिरीक्षक संवर्गातील २५० पदांवरील नियुक्तीसाठी १६ एप्रिल रोजी पोलिस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा २०२१ घेण्यात आली होती. या पूर्व परीक्षेचा ९ जून रोजी निकाल जाहीर करण्यात आला. या निकालाच्या आधारे ३० जुलै रोजी मुख्य परीक्षा झाली. या परीक्षेचा निकाल २३ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आला. मुख्य परीक्षेच्या निकालाआधारे एकूण एक हजार ३१ उमेदवार शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरले होते.

विकल्पासाठी १० डिसेंबरपर्यंत मुदत

परीक्षेच्या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (ऑप्टिंग आऊट) विकल्प सादर करण्याकरीता आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ‘ऑनलाइन फॅसिलिटिज्‌’ या मेनूमध्ये ‘पोस्ट प्रेफरन्स/ऑप्टिंग आऊट’ वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सदर वेबलिंक तीन ते १० डिसेंबरपर्यंत सुरु राहील. ऑनलाइन पद्धतीखेरीज अन्य कोणत्याही प्रकारे पाठविलेला भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय ग्राह्य धरला जाणार नाही, असे आयोगाने म्हटले आहे.

या परीक्षेचा निकाल म्हणजे विश्‍वास आणि‌ कामकाजातील पारदर्शकतेचा परिणाम आहे. देशात इतक्या वेगाने निकाल जाहीर करणारे महाराष्ट्र लोकसेवा आयोग हे पहिलेच असेल.

- डॉ. प्रताप दीघावकर, सदस्य, महाराष्ट्र लोकसेवा आयोग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

Latest Maharashtra News Updates : उद्या ठाकरेंचा विजयी मेळावा- वरळी डोममध्ये तयारी सुरु

ST Pass : एकाच महिन्यात 5 लाख विद्यार्थ्यांना शाळेत मिळाले एसटी पास; कोणाला मिळतो सवलतीचा पास? वाचा...

Indian Women Cricket Team: भारतीय महिला संघ आज रचणार इतिहास; T20 मालिका जिंकण्याची संधी

"निलेश तू कसा आहेस माहितीये..." साबळेंच्या व्हायरल व्हिडिओनंतर मराठी अभिनेता झाला व्यक्त ; म्हणाला..

SCROLL FOR NEXT