तुळजापूर ते सप्तशृंगीगड बस esakal
नाशिक

तुळजापूर ते सप्तशृंगीगड बससेवा आजपासून

दिगंबर पाटोळे

वणी (नाशिक) : साडेतीन शक्तिपीठांपैकी प्रमुख शक्तिपीठ असलेले तुळजापूर ते अर्धे व स्वयंभू शक्तिपीठ असलेले सप्तशृंगीगड या दोन शक्तिपीठांना जोडणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेस सोमवार (ता. २७)पासून प्रारंभ होत आहे. या बससेवेने तुळजाभवानी, तर सप्तशृंगी मातेचे दर्शन भाविकांना सुलभ होणार आहे. (State Transport Corporations bus service connecting Tuljapur to Saptashringigad is starting from today in nashik)

अनेक दिवसांची भाविकांबरोबरच सप्तश्रृंगी निवासिनी देवी ट्रस्ट, सप्तशृंगगड ग्रामस्थ, तसेच पाथरुड येथील ग्रामस्थांच्या मागणीची राज्य परिवहन महामंडळाने दखल घेत तुळजापूर ते सप्तशृंगगड बस सेवेस सोमवारपासून प्रारंभ होत आहे.

तुळजापुर येथून सायंकाळी आठला बस सप्तशृंगीगड (वणी) कडे मार्गस्थ होऊन त्यानंतर उस्मानाबादला रात्री ८.२५ ला, भूम येथे रात्री दहाला, पाथरूड येथे रात्री १०.२०, जामखेड येथे रात्री साडेअकराला, आष्टी येथे रात्री बाराला, अहमदनगरला मध्यरात्री पाऊणला, शिर्डी येथे पहाटे साडेतीनला, सिन्नर पहाटे साडेपाच, नाशिकला सकाळी सव्वासहाला, सप्तशृंगीगडावर सकाळी आठला, असा १२ तासांचा प्रवास करून पोचेल.

तसेच सप्तशृंगीगडावरुन रात्री सव्वाआठला बस निघून नाशिकला दहाला, सिन्नरला पावणेअकराला, शिर्डी रात्री पावणेदोनला, अहमदनगरला पहाटे अडीचला, आष्टी पहाटे सव्वाचारला, जामखेडला पावणेपाचला, पाथरूड येथे साडेपाचला, भूम येथे सव्वासहाला, उस्मानाबादला सकाळी ७.५० ला व शेवटी तुळजापूर येथे सकाळी सव्वाआठला पोचेल. या बससेवेचा श्रीक्षेत्र तुळजापूर व श्रीक्षेत्र सप्तश्रृंगीगड या मार्गावरील सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सप्तशृंगीगड, तुळजापूर येथील ट्रस्ट, ग्रामपंचायत, ग्रामस्थ यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: पुण्यात व्यावसायिक वाहनांसाठी फिटनेस अनिवार्य; प्रक्रिया मात्र ठप्प, १ फेब्रुवारीपासून आगाऊ बुकिंग बंद

Education News : झूम मीटिंगद्वारे वर्गावर्गांवर नजर! जळगावात कॉपी रोखण्यासाठी प्रशासनाचे कडक पाऊल

Latest Marathi News Live Update : कुलाबा परिसरातील नागरिक आदित्य ठाकरेंची भेट घेण्यासाठी दाखल

Thane Metro: डोंबिवलीतील वाहतूककोंडी फुटणार! 'मेट्रो १२'चा विस्तार होणार, श्रीकांत शिंदेंनी संपूर्ण प्लॅनच सांगितला

Jalgaon Municipal Corporation : जळगाव महापालिकेच्या गाळेभाड्याचा तिढा कायम! २ व ३ टक्के दराने पालिकेचे होणार कोट्यवधींचे नुकसान

SCROLL FOR NEXT