chori.jpg 
नाशिक

'आई तू इथंच थांब, मी आता आलो!'...म्हणून 'ते' पुन्हा बॅंकेत गेले...अन् परतताच बघता तर काय?

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (पिंपळगाव बसवंत) बॅंकेतून काढलेले दोन लाख दहा हजार रुपये मोटार सायकलच्या डिकीत ठेवले असताना पाळत ठेवून असलेल्या एका चोरट्याने ते लंपास केले. पिंपळगाव बसवंतच्या स्टेट बॅंकेसमोर दुपारी तीनच्या सुमारास हा प्रकार घडला. 

अशी आहे घटना

वैभव प्रभाकर जाधव (रा. शिरसगाव रोड, पिंपळगाव बसवंत) निवृत्त सैनिक आहेत. निवृत्तीची रक्कम त्यांनी स्टेट बॅंकेच्या खात्यावर ठेवलेली होती. त्यातील एक लाख 80 हजार रुपये स्वत:च्या खात्यावरून, तर आई मंदाबाई जाधव यांच्या खात्यावरून 30 हजार रुपये काढले. ती रक्कम दुचाकीच्या डिकीत ठेवली. आईला दुचाकीजवळ उभे करून ते पुन्हा बॅंकेत गेले. त्याचदरम्यान मंदाबाई जाधव यांचे लक्ष विचलित होताच डिकी खोलून त्यातील दोन लाख रुपये चोरट्यांनी लांबविले. वैभव जाधव जेव्हा परतले तर बघता तर काय, डिकीतून दोन लाख दहा हजार रुपये गायब झाले होते. याबाबत श्री. जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पिंपळगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक संजय महाजन तपास करीत आहेत.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahad Chavdartale : 'कागदावर नको, प्रत्यक्ष काम दाखवा'; महाडच्या चवदार तळ्याची पाहणी करत आनंदराज आंबेडकरांचा प्रशासनाला इशारा

Jalna News: इंधन पुरवठा विस्कळित, ३७ पेट्रोल पंप बंद वाहनचालकांची गैरसोय ; साखळीत व्यत्यय आल्याने उद्भवली परिस्थिती

Mumbai: दादर स्थानकाबाहेर धक्कादायक प्रकार! इडली विक्रेत्याकडून पदार्थांसाठी शौचालयाच्या पाण्याचा वापर, व्हिडिओ व्हायरल

Pune Crime News : पुण्यात संतापजनक घटना! धावत्या कारमध्ये वकील महिलेवर अत्याचार, नेमकं काय घडलं?

मालिकेतील वडिलांनीच खऱ्या आयुष्यात केलेलं मिताली मयेकरचं कन्यादान; म्हणाले, 'मला मुलं नाहीत पण...'

SCROLL FOR NEXT