Car caught in CCTV Footage esakal
नाशिक

शहरातून चोरी झालेल्या कारचा मालेगावच्या जबरी चोरीत वापर

युनूस शेख

जुने नाशिक : मालेगाव सोयगाव रोडवरील शरद नामदेव दुसाने नामक सराफ दुकानात गुरुवारी (ता. २३) मध्यरात्री जबरी चोरी (Robbery) झाली. घटनेत रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने (Jewelry) असा सुमारे २१ लाख ७५ हजारांचा ऐवज चोरीस गेला आहे. जबरी चोरीत काठे गल्ली येथून चोरी झालेल्या मारुती एस्टीम कारचा वापर झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मालेगाव कॅम्प पोलिस ठाणे आणि भद्रकाली पोलिस ठाण्याकडून तपास सुरू आहे. कॉलेज रोड सोयगाव मालेगाव येथील शरद नामदेव दुसाने सराफ दुकानात (Jewelry Shop) जबरी चोरी झाली. (stolen car from nashik city used in robbery in Malegaon Nashik Crime News)

याप्रकरणी मालेगाव कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, त्यात मारुती एस्टिम कारचा वापर झाल्याचे निदर्शनात आले आहे. त्यानुसार त्यांनी शहर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात सीसीटीव्ही फुटेज तसेच कारचे छायाचित्र दिले. अधिक तपासणी केला असता, काठे गल्ली येथून बुधवारी (ता. २२) ते गुरुवार (ता. २३) सकाळी मारुती एस्टिम कार (एमएच- १५- बीएन- ७७७३) चोरी झाली आहे. एकनाथ खनवे यांच्या तक्रारीवरून भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. भद्रकाली पोलिस कारचा तपास करत असताना, संबंधित कारचा सराफ दुकान चोरीच्या घटनेत वापर झाल्याची माहिती समोर आली आहे.

त्याबाबतची सीसीटीव्ही फुटेजदेखील प्राप्त झाले आहे. परंतु, अद्याप मालेगाव पोलिसांकडून चोरीचा उलगडा झाला नाही. तसेच भद्रकाली पोलिसांनादेखील कारची माहिती मिळू शकलेली नाही. दोन्ही पोलिस ठाण्याकडून तपास सुरू आहे. विशेष म्हणजे ज्या रात्री कार चोरी झाली, त्याच रात्री चोरीची घटना घडली. नियोजनपूर्वक दोन्ही चोरी झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

मोठी बातमी : भारत-बांगलादेश मालिका स्थगित; रोहित शर्मा, विराट कोहली यांना ऑक्टोबरपर्यंत मिळाली सुट्टी

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

SCROLL FOR NEXT