Amount seized by the police.
Amount seized by the police. esakal
नाशिक

Nashik Crime News : चोरीची रक्कम हस्तगत; मात्र संशयितांची हातावर तुरी!

सकाळ वृत्तसेवा

पंचवटी (जि. नाशिक) : पेठ नाक्यावरील स्टेट बँकेतून पंधरा दिवसांपूर्वी तिघा संशयितांनी कॅश काउंटरवर जमा असलेली १७ लाख रुपयांची रोकड हातोहात चोरून नेल्याची घटना घडली होती. या घटनेचा तपास सुरू असताना, हे संशयित मध्य प्रदेशमधील असल्याचे निष्पन्न झाले. पंचवटी पोलिस तपास पथक चोरट्यांना पकडण्यासाठी मध्य प्रदेशमध्ये पोचले. चोरीला गेलेल्या १७ लाखांपैकी १४ लाख रुपये हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले, मात्र एकही संशयित ताब्यात घेतले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (stolen money find from SBI by panchavati police nashik Latest Crime News)

२ नोव्हेंबरला ही घटना घडली होती. संशयित रुषी अनुपसिंग छायल याने १७ लाख रुपयांची रोकड हातोहात लंपास केली. यानंतर बँकेत दुसरीकडे उभा असलेला त्याचा साथीदार करण पप्पू सासी व बँकेच्या बाहेर टेहेळणी करीत उभा असलेला नरपतसिंग नथुलाल दफाणी (तिघेही रा. गाव कडीया सासी, ता. पचौर, मध्य प्रदेश) हे फरार झाले. घटनेचा वरिष्ठ निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असताना, संशयित मध्य प्रदेशमधील असल्याचे समोर आले.

पथक संशयितांच्या गावी संशयितांना अटक करण्यासाठी पोचले. पण संशयित फरार असल्याने, संशयितांच्या कुटुंबीयांकडून पोलिसांनी बँकेतून चोरलेल्या १७ लाख रुपयांपैकी १४ लाख रुपये हस्तगत केले. याबाबत गुरुवारी (ता.१७) पंचवटी पोलिस ठाण्यात उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. दरम्यान, घटनेतील फरार संशयित पोलिसांच्या रडारवर असून लवकरच त्यांना जेरबंद केले जाणार असल्याचे यावेळी चव्हाण यांनी सांगितले.

गावात सर्वच गुन्हेगार प्रवृत्तीचे

स्टेट बँक सारख्या बँकेतून एवढी मोठी रक्कम चोरीला जाते, यावरून स्थानिक गुन्हेगार यांचाही समावेश असण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशमधील असलेले हे तिघेही संशयित सराईत गुन्हेगार असून आहेत.

संशयित राहत असलेल्या गावात सर्वजण अशाच गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याने गुन्हेगारांना अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हे नागरिक हल्ला करीत असल्याचे या वेळी पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Premji Invest: आता 'ही' बँक होणार विप्रोच्या मालकीची? अझीम प्रेमजी 'या' बँकेतील 51 टक्के हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत

Canada Accident: कॅनडात भारतीय आजी-आजोबांसह तीन महिन्याच्या नातवाचा अपघातात मृत्यू; दुतावासही हळहळलं

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

Latest Marathi News Live Update : ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी मुख्यमंत्र्यांनी कसली कंबर

SCROLL FOR NEXT