Stone carved roof esakal
नाशिक

अंकाई किल्ल्याच्या पठारावर गुहेत नक्षीदार दगडी ‘सिलिंग’

आनंद बोरा

नाशिक : मनमाडजवळील अंकाई-टंकाई किल्ल्याच्या पठारावरील गुहेत नक्षीदार दगडी ‘सिलिंग’ पाहावयास मिळते. माथ्यावर अगस्ती ऋषींचे मंदिर आहे. या मंदिराजवळ सीतागुंफा आणि अगस्तीगुंफा आहे. त्याचठिकाणी आणखी एका गुहेत नक्षीदार दगडी काम दिसून येते. गुहेत अंधार असल्याने छताकडे सहसा लक्ष जात नाही.

अनेक गुपीते घेवून उभा असलेला अंकाई किल्ला

गुहेत आतील बाजूला जणू एक छोटे घर दिसते. आतमध्ये दोन ते तीन खोल्या दिसतात. हा किल्ला सातमाळ रांगेत असून, मनमाडपासून आठ किलोमीटर अंतरावर, समुद्रसपाटीपासून तीन हजार २०० फूट उंचीवर आहे. जोडदुर्ग असा उल्लेख परदेशी प्रवास वर्णनात आढळतो. समुद्र किनाऱ्यावरील बंदरातून आयात-निर्यात व्यापार रस्त्याच्या मार्गे औरंगाबाद, जालना, बऱ्हाणपूर, पैठण, सोलापूरशी चालायचा. त्या व्यापारीमार्गावर हे किल्ले आहेत. बादशाहनामा ग्रंथात तसा उल्लेख आढळतो. देवगिरीच्या यादव राजवटीमधील हा किल्ला. खानदेशातील कळवण, बागलाण, मालेगावसह नांदगाव, चांदवड हे तालुके पेशव्यांनी होळकरांना दिले. यातील काही पेशव्यांनी स्वतःकडे ठेवले. त्यातील एक अंकाई-टंकाई किल्ला होय. इतिहासाचा साक्षीदार असलेला हा किल्ला अनेक गुपीते घेवून उभा आहे.

पायथ्याजवळील जैन लेणी किल्ला ऐतिहासिक असल्याची साक्ष देतात. किल्ल्यावरील गुहा, पाण्याची तळी थक्क करणारी आहेत. किल्लेदारांचे निवास असलेला बालेकिल्ला परिसरातील एकमेव कोरडा तलाव अभ्यासाचा विषय आहे. गुहेतील एका खोलीत ‘इको साउंड’ ऐकू येतो. आपला आवाज घुमतो. गुहेच्या छतावर काळ्या पाषणात सुंदर नक्षीकाम केलेले आहे. मनमाडमधील गिर्यारोहक प्रवीण व्यवहारे यांनी दगडी ‘सिलिंग’ शोधली आहे.

''मी गेल्या पंचवीस वर्षांपासून किल्ल्यावर नेहमी येत असतो. किल्ल्यावरील गुहा मला नेहमी आकर्षित करते. ही गुहा इतर गुहांपेक्षा वेगळी दिसते. आपण आत बोललो की आवाज घुमतो. गुहेची रचना पाहिल्यावर हे घर असावे आणि त्याठिकाणी ध्यानसाधना होत असावी, असे जाणवते.'' - प्रवीण व्यवहारे, गिर्यारोहक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT