prabudh nagar dagadfek 1.jpg 
नाशिक

स्वच्छतागृहाचा वापर करण्यावरून वाद इतका गेला विकोपाला...की तुफान दगडफेक!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : प्रबुद्धनगरातील रहिवाश्यांसाठी एका खासगी कंपनीने येथील चौकात सार्वजनिक शौचालय बांधून दिलेले आहे.प्रबुद्धनगर झोपडपट्टीत महिंद्र कंपनीने नागरिकांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृह बांधून दिले आहे. याचा वापर पालवे व मांजरे परिवारास करू देण्यास पवार व खाडे परिवारांचा विरोध होता. स्वच्छतागृहाचा वापर केवळ पवार व खाडे परिवार करतील, यावरून परिवारांमध्ये वाद सुरू होता. अन् तोच वाड इतका विकोपाला गेला की...

असा घडला प्रकार...

प्रबुद्धनगरातील सार्वजनिक शौचालय वापरावरुन दोन गटात झालेल्या वादातून तुफान दगडफेक करण्यात आल्याने दोन्ही गटांनी एकमेकांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.तर सातपूर पोलिसांनी दोन्ही गटातील ३१ पैकी २८ संशियतांना अटक केली आहे. प्रबुद्धनगरातील रहिवाश्यांसाठी एका खासगी कंपनीने येथील चौकात सार्वजनिक शौचालय बांधून दिलेले आहे. जवळच असलेल्या पालवे आणि मांजरे परिवारास पवार आणि खाडे परिवाराचा शौचालय वापरास विरोध होता. सोमवारी रात्रीच्या वेळी हा वाद विकोपास गेला. दोन्ही गटांनी एकमेकांवर तुफान दगडफेक केल्याने दोन्ही गटांतील काही महिला व पुरुष जखमी झाले होते. जखमींना उपचारासाठी रात्रीच शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांनी पोलीस फौजफाट्यासह प्रबुद्धनगरात धाव घेतली. तसेच उपायुक्त विजय खरात, सहाय्यक आयुक्त मंगलसिंह सूर्यवंशीदेखील घटनास्थळी तत्काळ पोहचले. यावेळी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणणात आणली. दोन्ही गटांनी एकमेकांच्या विरोधात सातपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

28 जणांना अटक

पोलिसांनी दोन्ही गटातील ३१ पैकी २८ संशयितांना अटक करु न मंगळवारी न्यायालयात हजर केले असून उर्वरित तिघांचा शोध घेत आहेत.सातपूर औद्योगिक वसाहतीतील प्रबुद्धनगर झोपडपट्टीत अवैध मद्य विक्री होत असल्याची तक्रार येथील रहिवााशांनी पोलिसांकडे वेळोवेळी केली आहे. दगडफेकीची घटना घडली त्याच्या दोन दिवस अगोदर अवैध दारु विक्री करणाऱ्यांना लोकांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्याचाच परिणाम म्हणून दोन गटांत हाणामारी झाल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. अवैध मद्यविक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई न केल्यास अशाप्रकारचे वाद होतच राहतील अशीही चर्चा आहे.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लॉन्चपूर्वीच सिक्रेट जगजाहीर! समोर आली Samsung Galaxy A57 अन् A37 स्मार्टफोनची किंमत; पाहा सगळे वेरिएंट एका क्लिकवर

Panchganga river pollution : पंचगंगा नदीत काळेकुट्ट पाणी; ऑक्सिजनअभावी मासे मृत, इचलकरंजीत खळबळ

Ajit Pawar: ''अशोक खरातच्या माध्यमातून अजित पवारांच्या घराबाहेर काळी जादू..'', कुणाचा हात? रोहित पवारांनी सांगितला घटनाक्रम

Monalisa Viral Girl Case : 'व्हायरल गर्ल' मोनालिसाचा चित्रपट दिग्दर्शकावर गंभीर आरोप; म्हणाली, 'सेटवर अनेक वेळा माझ्यासोबत...', मनोरंजन विश्वात उडाली खळबळ

Free AI Courses: गूगल, अ‍ॅमॅझॉसह ह्या ५ कंपन्या देत आहेत फ्री AI शिक्षण; जाणून घ्या कोर्स कुठे आणि कसा करायचा

SCROLL FOR NEXT