Stop debt collection of women self help groups 
नाशिक

महिला बचतगटांची कर्जवसुली थांबवा; आमदार हिरे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

विक्रांत मते

नाशिक : लॉकडाउन काळात महिला बचतगटांच्या माध्यमातून निर्माण होत असलेले उत्पादन पूर्णपणे थंडावल्याने आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. महिला बचतगटांनी ज्या वित्तिय संस्थांकडून कर्ज घेतले, त्यांनी वसुलीसाठी तगादा लावल्याने गरीब महिला आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत. त्यामुळे महिला बचतगटांकडून कर्जवसुली थांबविण्याची मागणी आमदार सीमा हिरे यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे केली. 

लॉकडाउनच्या काळात अनेक उद्योग व्यवसाय, छोटे मोठे व्यवसाय बंद पडल्याने या काळात अनेकांना रोजगाराला मुकावे लागले. त्यात महिला बचतगटांनाही लॉकडाउनचा फटका बसला. महिला बचतगटांनी व्यवसायासाठी कर्ज घेतले आहे. आर्थिक दुर्बल घटकातील या महिलांकडे कर्जवसुलीसाठी तगादा लावला जात होता. त्यापार्श्‍वभूमीवर आमदार हिरे यांच्याकडे महिला बचतगटांनी तक्रार केली. आमदार हिरे यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची भेट घेऊन निवेदन दिले. वित्तिय संस्थांनी कर्जवसुलीसाठी तगादा लावल्यास थेट संपर्क करण्याचे आवाहन जिल्हाधिकार्यांनी केले. या वेळी नगरसेविका छाया देवांग, अर्चना दिंडोरकर, जान्हवी बिरारी, सरिता पाटील, रेखा गोसावी, रचना गायकवाड, मंगल देवरे, रेखा शेलार या उपस्थित होत्या. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

MPSC Student Agitation : अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

IND A vs AUS A, 1st ODI: पाटीदार लढला, पण बाकी सारे ढेपाळले; भारताचा संघ १४९ वर ऑलआऊट, ऑस्ट्रेलियाचा मोठा विजय

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

SCROLL FOR NEXT