Former corporator Pandit Aware giving a statement to MP Hemant Godse. esakal
नाशिक

Nashik: नाशिकरोड, शिर्डी प्रस्तावित लोहमार्गाच्या सर्वेक्षणाचे काम बंद करा; शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची खा. गोडसेंकडे मागणी

प्रस्ताव‍ित लोहमार्ग देवळाली कॅम्प, चेहडी, चाडेगाव, मोहगाव, बाभळेश्वर, चांदग‍िरी, जाखोरी या गावांमधील श‍िवारातून जाणार असल्याने अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर अन्याय होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक रोड : श‍िर्डी, नाशिक रोड या प्रस्ताव‍ित लोहमार्गाच्या नव्याने सर्वेक्षणाचे काम सुरू झाले आहे. प्रस्ताव‍ित लोहमार्ग देवळाली कॅम्प, चेहडी, चाडेगाव, मोहगाव, बाभळेश्वर, चांदग‍िरी, जाखोरी या गावांमधील श‍िवारातून जाणार असल्याने अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर अन्याय होणार आहे.

या जमिनींच्याऐवजी सदर प्रस्ताव‍ित लोहमार्ग पूर्वी सर्वेक्षण झालेल्या जम‍िनींमधून जावा असे स्पष्ट करत नव्याने सुरू करण्यात आलेल्या जम‍िनींवरील सर्वेक्षण तत्काळ बंद करावे अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांच्या एका श‍िष्टमंडळाने खासदार हेमंत गोडसे यांच्याकडे एका न‍िवेदनाद्वारे केली आहे. (Stop survey work on Nashik Road Shirdi proposed railway delegation of farmers Request to mp hemant Godse Nashik)

गेल्या काही वर्षांपासून नाश‍िकरोड- श‍िर्डी या दरम्यान प्रस्ताव‍ित लोहमार्ग आहे. सदर लोहमार्ग पूर्वी इंड‍िया बुल्स कंपनी कर‍ीता संपा‍द‍ित झालेल्या जमिनीतून प्रस्तावित होता.

यामुळे नाश‍िकरोड -श‍िर्डी या रस्त्याचे अंतर ३० क‍िलोमीटरने कमी होणार होते. असे असले तरी नाश‍िकरोड-श‍िर्डी या दरम्यानच्या प्रस्ताव‍ित लोहमार्गासाठी गेल्या काही द‍िवसांपासून नव्याने देवळाली कॅम्प, चेहडी, चाडेगाव, मोहगाव, बाभळेश्‍वर, चांदग‍िरी, जाखोरी या गावांच्या श‍िवारातील जम‍िनीचे सर्वेक्षण सुरू झाले आहे.

सर्वेक्षण सुरू असलेल्या गावांमधील शेतकऱ्यांच्या जम‍िनी यापुर्वी शासनाच्या व‍िव‍िध प्रकल्पात गेलेल्या असल्याने येथील शेतकरी अल्प भूधारक झालेले आहेत.

तरी नव्याने सुरू करण्यात येत असलेले सर्वेक्षण तातडीने रद्द करावे अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांच्या श‍िष्टमंडळाने खासदार गोडसे यांच्याकडे केली आहे.

यावेळी माजी नगरसेवक पंडित आवारे, नितीन खर्जुल, संतोष साळवे, बाजीराव भागवत, योगेश टिळे, माणिक मानकर, रामभाऊ अस्वले, रवी जाधव, राजाभाऊ जाधव, निशांत भोर, युवराज जगळे, कैलास टिळे, अंकुश टिळे, समाधान टिळे, सुनील टिळे, लखन टिळे, बंडू टिळे, चिंतामण टिळे, बाळासाहेब टिळे, संजय टिळे, शिवाजी टिळे,अनिल टिळे, ज्ञानेश्वर टिळे, मोहन टिळे, बबन टिळे, कचरू टिळे, किरण टिळे आद‍ी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT