murtikar.jpg 
नाशिक

कष्टात आनंद शोधणारा अवलिया, चालवतोय सासऱ्यांचा वारसा; गोष्ट दगडाला देवपण देणाऱ्या रघुनाथांची

दिपक आहिरे

पिंपळगाव बसवंत (नाशिक) : निसर्गाने चौसष्ट कलाचे वरदान माणसाला दिले आहे. त्यातील एखादी कला जरी अवगत असेल तर कुटुबांचा उदरनिर्वाह होऊ शकतो. आधुनिक यंत्राने आकर्षक वस्तु बनविल्या जाण्याच्या हायटेक जमान्यात पिंपळगांव बसवंत येथे रघुनाथ राठोड मात्र हस्ते कलेतुन दगडाला आकार देत देवीदेवीताच्या आकर्षक मुर्तीसह गृहउपयोगी वस्तु साकारत आहे. ओबड धोबड आकाराच्या दगडातुन आतापर्यंत रघुनाथ यांनी 50 हजार पेक्षा अधिक मुर्ती घडविल्या आहेत.

सासऱ्यांकडून मिळाला वसा

कोणत्या प्रकारचे कष्ट करण्याची तयारी व जिद्द असलेले राजस्थानचा रघुनाथ राठोड हे वीस वर्षापुर्वी पिंपळगाव शहरात सहकुटुंब आले. सोबत येतांना सासरे रामनाथ पवार यांच्याकडुन पाषाणातुन मुर्तीला आकार देण्याची कला घेऊन आले. हाती असलेली कला हाच जर आपला व्यवसाय असेल तर तो अधिक बहरतो. रघुनाथ यांच्या बाबतीत तेच घडले. प्रारंभी फारसा प्रतिसाद मिळाला नाही. अनेकदा घाव चुकला म्हणुन बोटाला, हाताला ईजा झाली. पण हार मानली नाही. रघुनाथ यांना स्वत:च्या कलेवर विश्‍वास होता. पोटा भरण्यासाठी कष्टाची तयारी ठेवावी लागतेच. अखेर त्यांनी घडविलेल्या मुर्ती नागरिकांच्या पसंतीस पडू लागल्या. अन् रघुनाथ यांच्या कलेची ख्याती दुरवर पसरली. मारवल, सफेद, काळा, दगड, पाषाण यातून श्रीगणेश, दुर्गा, खंडोबा महाराज, महाकाली, हनुमान अशा देवी देवताच्या मुर्ती घडवित आहे. 

आतापर्यंत 50 हजारपेक्षा अधिक मुर्ती घडविल्या

पिंपळगावच्या महामार्गावरील ओरियन्टल बॅकेलगत रघुनाथ दगडावर घनाचा घाव घालतांना दिसतात. मुर्तीबरोबरच दगडी जाते, उखळ, खलबत्ता, पाटा, वरंवटा आदी गृहउपयोगी वस्तुही ते बनवितात. परिसरातील मदिरामध्ये लागणाऱ्य मुर्ती किंवा पुर्वजाचे पुतळे बनविण्यासाठी राठोड यांच्याकडे मोठी मागणी असते. राठोड यांचा मुलगा सुरज हा ही वडीलाच्या पारंपारिक व्यवसायात मदत करतो. सुरज 12 वी विज्ञान शाखेतुन 57 टक्के गुण मिळवुन उत्तीर्ण झाला आहे. वडीलांना मदत करतांना उच्चशिक्षीत होण्याचे त्याचे स्वप्न आहे.

मी नाही शिकलो पण मुलाला उच्चशिक्षीत करून अधिकारी बनविण्याचे स्वप्न आहे. दगडाला आकार देणे ही माझी आवड व उपजिवीका आहे. त्यामुळे कष्टाचे काम असले तरी आनंद मिळतो. - रघुनाथ राठोड (कारागीर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Play Off Scenario: गुजरात टायटन्सचा सलग पाचवा विजय! सनरायझर्स हैदराबादला नमवून POINT TABLE मध्ये अव्वल, अनपेक्षित कलाटणी

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सच्या संघात बदल... प्ले ऑफच्या शर्यतीसाठी मिळालं बळ... पुण्याच्या रामकृष्ण घोषच्या जागी एन्ट्री

Triple Accident : रजापूर शिवारात तिहेरी अपघात; वाळू वाहतूक करणारा हायवा पलटी, दोन कारची धडक, चार ते पाच जण किरकोळ जखमी

Amit Satam: पंतप्रधानांच्या 'इंधन बचती'ला मुंबई भाजपचा हरताळ; अमित साटम यांचा २५ गाड्यांचा 'शाही' ताफा वादाच्या भोवऱ्यात!

GT vs SRH Live : टप्पा खाऊन आऊट... अभिषेक शर्मा विचित्र पद्धतीने बाद झाला, कागिसो रबाडाला हसू आवरेना... Video Viral

SCROLL FOR NEXT