A dusty empire on the road between New Bus Stand and Daregaon Chauphuli at Malegaon esakal
नाशिक

Nashik News : मालेगावात रस्त्यांची धुळधान; खराब हवामानामुळे विकारांनी जखडले

सकाळ वृत्तसेवा

सोयगाव (जि. नाशिक) : शहरवासियांना गेल्या दोन आठवड्यांपासून सर्दी, खोकला व श्‍वसन विकारांनी जखडले आहे. रस्त्यांची धुळधान, खराब हवामानामुळे आरोग्य विकारात वाढ झाली आहे. अनेक वर्षांपासून बंद असलेले उड्डाणपुलाचे काम सुरू झाले आहे. शहरातील अन्य बहुसंख्य रस्त्यांची कामे सुरु झाल्याने धुळीचा त्रास जाणवत आहे. धूळ उडून अंगाला खाज, सर्दी आणि चक्क दम्याला निमंत्रण मिळत आहे. त्यातच ढगाळ व खराब हवामानमुळे सर्दी, खोकला जोर धरु लागला आहे. ज्येष्ठ नागरिक, बालक रुग्णांना त्यांचा सर्वाधिक धोका असल्याचे तज्ज्ञ सांगतात. (Street dusting in Malegaon Bad weather caused disorders Nashik Latest Marathi News)

निरोगी आयुष्यासाठी दररोज सकाळी नागरिक विविध मार्गावर मार्निंग वॉकसाठी बाहेर पडतात. मात्र, शहरातील बसस्थानकासमोरील बंद पडलेले उड्डाणपूलाचे काम, विविध भागात सुरू असलेली रस्त्यांची कामे त्यामुळे दिवसभर या मार्गावर मोठ्या प्रमाणात धूळ असते. धुळीकडे मनपा व आरोग्य विभागाचे सोयीस्कररित्या दुर्लक्ष असते. जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांप्रमाणे ५० मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर तर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांप्रमाणे १०० मायक्रोग्रॅम प्रती घनमीटरपेक्षा अधिक धूलिकण आरोग्यास धोकादायक आहेत.

शहरात या धूलिकणांचे प्रमाण क्षमतेपेक्षा तिप्पट आहे. दम्याचा धोका धुळीसोबत मातीतील जंतू नाकातोंडात जाऊन डोळ्यांत जळजळ, घसा दुखणे, नाक वाहणे, खोकला, हृदयविकार, छातीदुखी असा त्रास जाणवतो. यामुळे दमा संभवतो. धूलिकण विशिष्ट उंचीच्या खालीच तरंगत असल्याने ० ते ६ वयोगटातील चिमुकल्यांना तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी अधिक धोकादायक असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांकडून सांगण्यात आले.

काळजी घेण्याचे आवाहन

धुळीच्या ठिकाणी वाहनांची गती कमी ठेवणे. नियमित अंतराने रस्ते स्वच्छ करणे धुळीवर पाणी फवारणे, वाढते धुळीचे प्रमाण हे धोकादायक ठरणारे आहे. त्यामुळे दम्याच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ शकते. अशावेळी तोंडाला रुमाल बांधून बाहेर पडावे. नागरिकांनी यासंदर्भात काळजी घ्यावी. त्यातच ढगाळ व खराब हवामानामुळे सर्दी, खोकल्याची रुग्णसंख्या वाढली आहे. शहरात विविध रुग्णालयात असे रुग्ण आढळून येत आहेत. खासगी बाल रुग्णालयेही हाऊसफुल आहेत. बालकांसाठी पालकांनी काळजी घ्यावी, असे तज्ज्ञांनी सांगितले.

हेही वाचा : Digital Rupee India : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’

या रस्त्यांवर स्थिती बिकट

- कॉलेज रस्ता

- मोसम चौक ते दरेगाव

- टेहेरे चौफुली ते मोसम चौक

- कॅम्प रस्ता

- शहरातील विविध कॉलनी रस्ते

धुळीपासून वाचण्याचे उपाय

- दुचाकी चालवत असताना हेल्मेटचा वापर करावा

- तोडाला मास्क लावावा किंवा स्वच्छ रुमाल बांधावा

- डोळ्यांसाठी गॉगल, चष्मा यांचा वापर करावा

- त्रास होत असेल तर तातडीने वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

"शहरातील एक- दोन नाही तर प्रत्येक रस्त्यावर धूळ आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणत त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे दुचाकीने जाणे तर जिकरीचे होते. रुमाल किंवा मास्क वापरल्याशिवाय पर्याय राहत नाही. संबधित विभागाने तत्काळ दखल घ्यावी."

- जयेश आहिरे, सामाजिक कार्यकर्ते

"धुळीच्या सतत संपर्कामुळे श्वसनासंबंधी विकार होण्याचा धोका असतो. सर्दी, खोकला, घसादुखी, डोळ्यांचे विकार धुळीमुळे उद्‌भवतात. ज्यांना धुळीची ॲलर्जी आहे त्यांनी योग्य काळजी घेण्याची आवश्यकता आहे. सध्या तर वातावरण बदलांमुळे घरोघरी सर्दी, खोकल्याचे रुग्ण आढळून येत आहेत. गरम पाणी प्यावे, धुळीपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ते उपाय करावेत." - डॉ. शेखर मगर, धन्वंतरी क्लिनिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT