strike continues as demands of Asha and group promoters are not resolved nashik news
strike continues as demands of Asha and group promoters are not resolved nashik news esakal
नाशिक

Nashik News: आशा, गटप्रवर्तक यांच्या मानधनात वाढ; मागण्यांवर तोडगा न निघाल्याने संप सुरूच

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : राज्यासह जिल्ह्यातील सुरू असलेल्या आशा व गटप्रवर्तक यांच्या संपाबाबत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत आशा व गटप्रवर्तक यांच्या मानधनात वाढ करण्याचा तसेच त्यांना दोन हजारांचा बोनस देण्यास मान्यता मिळाली.

परंतु, इतर मागण्यांबाबत कोणताही निर्णय न झाल्याने महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते, आशा गटप्रवर्तक संघटना (आयटक) कृती समितीने संप सुरूच ठेवण्याची भूमिका घेतली असल्याचे संघटनेचे राज्य अध्यक्ष राजू देसले यांनी सांगितले. (strike continues as demands of Asha and group promoters are not resolved nashik news)

विविध प्रलंबित मागण्यांसाठी आशा, गटप्रवर्तक यांचा १८ ऑक्टोबरपासून राज्यव्यापी संप सुरू आहे. संपावर तोडगा काढण्यासाठी दोन वेळा मंत्रालयातील बैठका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र, बुधवारी (ता. १) राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याबरोबर कृती समिती पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.

या वेळी आरोग्य अभियानाचे आयुक्त धीरजकुमार, आरोग्य प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, आरोग्य तांत्रिक संचालक सुभाष बोरकर उपस्थित होते. बैठकीत मागण्यांबाबत सविस्तर चर्चा झाली. बैठकीत मंत्री सावंत यांनी आशांना दरमहा सात हजार रुपये, गटप्रवर्तकांना सहा हजार २०० रुपये वाढ करण्यात येईल, असे जाहीर केले.

तसेच, दिवाळी भाऊबीज भेटही दोन हजार देण्यात येईल. आशांना मोबाईल रिचार्ज भत्ता १०० रुपयांवरून ३०० रुपये, जननी सुरक्षा योजनेत सरसकट लाभ देण्याबाबत निर्णय झाला. परंतु, गटप्रवर्तकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय झाला नाही.

गटप्रवर्तकांची ही मागणी पूर्ण होईपर्यंत संप सुरू राहील, असा निर्णय कृती समितीच्या बैठकीत झाला. बैठकीस कृती समितीचे राजू देसले, एम. ए. पाटील, शंकर पुजारी, आनंदी अवघडे, भगवान देशमुख, सुवर्णा मेतकर, प्रतिभा कर्डक, अर्चना गडाख, सुवर्णा गांगुर्डे, माया घोलप, सुवर्णा लोहकरे, सुरेखा खैरनार, सविता हगवणे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accindet: कोणालाही पाठीशी घालणार नाही; अजित पवारांनी केले स्पष्ट

Latest Marathi News Live Update: सुनील टिंगरे चौकशीसाठी तयार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

Amhi Jarange: 'आम्ही जरांगे -गरजवंत मराठ्यांचा लढा' चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार अण्णासाहेब पाटलांची भूमिका; टीझर रिलीज

Cristiano Ronaldo: शेवटच्या क्षणी पराभव, नेमारनंही डिवचलं अन् रोनाल्डोला अखेर अश्रु अनावर, पाहा Video

Chennai-Mumbai Flight: 172 प्रवाशांच्या जीवाशी खेळ, चेन्नई-मुंबई फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी, विमान अज्ञात स्थळी हलवले

SCROLL FOR NEXT