NMC News  esakal
नाशिक

NMC Anganwadi : महापालिकेच्या अंगणवाड्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट

सकाळ वृत्तसेवा

NMC Anganwadi : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिका हद्दीतील अंगणवाड्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना राज्याच्या महिला व बाल विकास विभागाने दिला आहेत.

त्याअनुषंगाने महापालिकेच्या बांधकाम विभागाने शहरातील ४१९ अंगणवाड्यांची तपासणी सुरू केली. (Structural Audit of NMC Anganwadi nashik)

रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे डोंगर खचून झालेल्या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली. त्यामुळे राज्य सरकार खडबडून जागे झाले असून, दुर्घटना टाळण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहे.

राज्य शासनाच्या महिला व बालकल्याण विकास विभागाने राज्यातील सर्व अंगणवाड्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे नाशिक महापालिकेला पत्र प्राप्त झाले आहे. महापालिकेच्या शहरात ४१९ अंगणवाड्या आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या अंगणवाड्यांच्या माध्यमातून आर्थिक परिस्थिती नाजूक असलेल्या पाल्यांना शिक्षण दिले जाते. महापालिकेचे समाजमंदिर, तसेच अन्य मालमत्तांमध्ये अंगणवाड्यांचे वर्ग भरविले जातात. या सर्व मालमत्तांचे स्ट्रक्चरल ऑडिट यानिमित्ताने होणार आहे.

समाजकल्याण विभागामार्फत बांधकाम विभागाला पत्र दिले असून, बांधकाम विभागाकडून स्ट्रक्चरल ऑडिटची तपासणी केली जात आहे.

"पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या महिला व बालकल्याण विकास विभागाने महापालिकेला अंगणवाड्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. बांधकाम विभागामार्फत अंमलबजावणी होत आहे." - प्रशांत पाटील, उपायुक्त, समाजकल्याण महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २१ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, नवव्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य

Pune Crime : मद्याच्या नशेत तरुणीचा विनयभंग करणाऱ्या पोलिस हवालदाराला अटक; हवालदाराला निलंबित करण्याचे दिले आदेश

Bail Pola Water Scarcity : पावसाचा खंड! पोळ्याला बोअरवेलच्या पाण्यावर बैलराजाची खांदेमळणी

Marathi News Live Updates : नागपूर RTO च्या परमिट विभागातील कथित अनियमिततेवरून मनसे आक्रमक

Swimming Competition : १३ वर्षीय विदीची ८१ किमी जलतरणात झेप; देश पातळीवर झालेल्यामुर्शिदाबाद स्पर्धेत द्वितीय क्रमांक

SCROLL FOR NEXT