suicide
suicide esakal
नाशिक

परिक्षेत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याने केली आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

सोग्रस (जि. नाशिक) : दहावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने बिहार राज्यातील १६ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (ता. १) सोग्रस येथे घडली.

चांदवड तालुक्यातील सोग्रस येथील एव्ही ब्रॉयलर कंपनीत कामगार असलेल्या नातेवाईकाकडे मनीषकुमार लल्लनराव यादव (वय १६, रा. कटहरिया, ता. ब्राहिम, जि. गोपालगंज, बिहार) हा मुलगा आलेला होता. दहावी परीक्षेचा निकाल त्याने कॉम्प्यूटरवर बघितला. परिक्षेत त्याला कमी गुण मिळाल्याचे लक्षात आल्यानंतर नैराश्‍यातून त्याने ब्रॉयलर कंपनीतील कामगार बिल्डींगमधील जिन्यात सकाळी ११ च्या सुमारास दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती एव्ही ब्रॉयलर कंपनीच्या व्यवस्थापकांनी वडाळी भोई पोलिसांना दिली. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी हजर होऊन मृतदेह वडाळी भोई शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी दाखल केला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मनीषकुमार यास तपासून मृत घोषित केले.

दरम्यान, दुपारी चारच्या सुमारास मनीषकुमारचा मृतदेह त्याच्या मूळगावी अंतिम संस्कारासाठी पाठविण्यात आला. यासंदर्भात वडाळीभोई पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पोलिस अधिकारी कैलास इंद्रेकर. श्री. कराड, श्री. घुमरे करीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ponzi Scam: 100 कोटी रुपयांच्या पॉन्झी घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पुणे, नाशिक अन् कोल्हापुरात छापे! काय आहे प्रकरण?

Canada Accident: कॅनडात भारतीय आजी-आजोबांसह तीन महिन्याच्या नातवाचा अपघातात मृत्यू; दुतावासही हळहळलं

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

SCROLL FOR NEXT