Car Google
नाशिक

भाऊ कॉलेजमध्ये 'जीएस' झाला, अन् कारच विसरुन आला..

विनोद बेदरकर

नाशिक : कायम मोबाईल ऑनलाईनच्या व्हर्च्युअल जगात कानावर हेडफोन लावून वावरणारी तरुणपिढी प्रत्यक्ष जीवणातून किती तुटत चालली आहे याचा प्रत्यय देणारी घटना नुकतीच गंगापूर रोड भागात घडली. मुंबईत नामांकित आभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षणारा एका तरुणाने पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली खरी पण जेव्हा खरा प्रकार लक्षात आला तेव्हा मात्र सर्वानीच सुटकेचा श्वास सोडला.. नेमके काय घडले एकदा वाचाच..

नुसते ऐकूनच हसू यावे अशा या घटनेत झाले असे की, मुंबईतील एका नामांकित संस्थेच्या महाविद्यालयात शिकणारा गंगापूर रोड मार्गावरील एक युवक घरकामासाठी दोन दिवसांपूर्वी कार घेउन बाजारात गेला. बाजारात खरेदी सुरु असतांना त्याला मोबाईल वर कॉल आला व महाविद्यालयात तो जनरल सेक्रेटरी (GS) झाल्याची बातमी मित्रांकडून कळली. चांगल्या गुणांच्या टक्केवारीहून विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून निवडण्याच्या प्रक्रियेतील ही निवड म्हणजे त्याच्यासाठी सुखद धक्काच होता. मित्रांसोबत आनंदाची बातमी ऐकता ऐकता तो चक्क पायीच चालत घऱी आला. घरी जेवण केले. पून्हा अभ्यास करुन रात्री झोपी गेला.

काय राव, साधे सीसीटीव्ही बसवत नाहीत..

दुसऱ्या दिवशी घरासमोर चारचाकीच नसल्याचे लक्षात आल्यावर कुटुंबातील सगळ्यच्याच तोंडचे पाणी पळाले. आई-वडीलांनी तातडीने चोरीला गेलेली गाडी शोधण्यासाठी त्यांच्या पत्रकार मित्राला दूरध्वनी केला. त्यांनी गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार येत असल्याने पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदविणे हाच उपाय असल्याचे सांगितले. गाडीची कागदपत्र घेउन हे कुटुंब थेट पोलिस ठाण्यात पोहोचले. तेथे गाडी चोरीला गेल्याची माहीती वरिष्ठ आधिकाऱ्यांनी सगळी माहिती ऐकून घेतली. प्राथमिक चौकशीचा भाग म्हणून कॉलनीची माहीती घेतली. सीसीटीव्ही आहे काय? हेही विचारले. घराजवळ सीसीटीव्ही नसल्याचे ऐकल्यावर वरिष्ठ आधिकाऱ्यांनी चार समजूतीच्या गोष्ठी ऐकवल्या. एवढी मोठी कॉलनी आणि साधे सीसीटीव्ही नाही असे म्हणत, कॉलनीत सीसीटीव्ही बसविण्याची सुचना केली. तसेच या भागात आणखी कुठे सीसीटीव्ही आहे का हेही शोधण्याच्या पोलिसांना सुचना देत वरिष्ठ आधिकारी निघून गेले.

शोधाशोध अन गोड शेवट

पोलिस ठाण्यातील प्राथमिक चौकशीचा भाग झाल्यानंतर साधारण पोलिस लागलीच तक्रार नोंदवून घेत नाहीत. जवळ कुठे गाडी आहे का, हेही शोधायला लावतात. त्यानुसार पोलिसांनी सुचना केली. शोधण्यासाठी जाण्यापूर्वी पोलिस ठाण्यात ज्या झायलो गाडीत आले त्या गाडीतून पून्हा घरी जाण्यासाठी निघाले. याच दरम्यान त्यांच्या वडीलांना टपाल कार्यालयात टपाल टाकण्याचे काम आठवले म्हणून मुलगा आदल्या दिवशी ज्या भागात खरेदीला गेला होता त्याच भागातून टपाल कार्यालयाजवळ पोहोचले. गाडीतून उतरले आणि काय आश्चर्य समोर चक्क आदल्या दिवशी हरवलेली गाडीच दर्शन झाले. गाडी इथे कशी असं जेव्हा वडीलांच्या लक्षात आलं तेव्हा या भाऊला आपणच काल गाडी घेऊन आलो तेव्हा येथे पार्क केली होती हेही आठवलं… एकुणच काय तर व्हर्च्युअल जगात कानावर हेडफोन लावून वावरणाऱ्या या तरुणाईवर त्याचा प्रत्यक्ष किती व कसा परिणाम होतो आहे याचा प्रत्यय देणारी ही घटना चांगलीच चर्चेचा विषय ठरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT