mid day meal
mid day meal esakal
नाशिक

पोषण आहाराचा तांदूळ सडवला? गुन्हा दाखल होण्याची शक्यता

विक्रांत मते

नाशिक : माध्यान्ह भोजनाचा (Mid Day Meal) ठेका पुरविणाऱ्या १३ संस्थांच्या उर्वरित पन्नास टक्के देयके अदा करावी की नाही यासंदर्भात शालेय शिक्षण मंत्र्यांच्या इतिवृत्ताचा आधार घेत चौकशीसाठी धडकलेल्या समितीला एका सेंट्रल किचनच्या जागेवर दोन वर्षांपासून शालेय पोषण आहाराचा दडवलेला शेकडो पोती तांदूळ (Rice) आढळून आल्याने खळबळ उडाली. विशेष म्हणजे समितीकडून वरवर पाहणी होत असताना महिला बचतगटाच्या महिलांनी अधिकाऱ्यांना जागेवर नेवून प्रकार दाखविल्यानंतर या प्रकरणाची गांभिर्याने दखल घेत पंचनामा करण्याचे काम शिक्षण विभागाकडून हाती घेण्यात आले.

सरकारी शाळांमधील (Government school) विद्यार्थ्यांचा शाळांमधील टक्का वाढावा, या उद्देशाने माध्यान्ह भोजन योजना राबविण्यात आली. योजनेच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेकडून निविदा प्रक्रिया राबविल्याने बचतगटाना सहभागी होता आले नाही. महापालिकेच्या शिक्षण विभागाने १३ ठेकेदारांना विभागून काम दिले. विशिष्ट ठेकेदारांना काम मिळावे म्हणून निविदा प्रक्रियेतील बदल संशयास्पद ठरले. दरम्यान, माध्यान्ह भोजन पुरविताना अन्नाचा दर्जा तसेच भोजन तयार होत असताना स्वच्छतेची काळजी घेतली जात नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. महापालिकेच्या पथकाने पाहणी केली. त्यानंतर १३ ठेके रद्द करण्यात आले. त्यानंतर महिला बचतगटाच्या माध्यमातून माध्यान्ह भोजन देण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, इगतपुरीचे (Igatpuri) काँग्रेसचे (Congress Party) आमदार हिरामण खोसकर (Hiraman Khoskar) यांच्या पत्रावर ठेकेदारांनी शालेय शिक्षण मंत्र्यांकडे देयके अदा करण्याची शिफारस करण्यात आली. त्या दरम्यान शिक्षण विभागाने (Education Departement) नव्याने काढली जाणारी निविदा प्रक्रिया स्थगित केली. त्याचबरोबर देयकांसंदर्भात सुनावणी घेण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी व आयुक्तांसमोर सुनावणी घेऊन अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार गुरुवारी (ता. २४) नाशिक येथे शिक्षण संचालक कार्यालयाचे प्रतिनिधींनी भेट देण्याचा निर्णय घेतला. ठेकेदारांचे जवळपास दोन कोटी ६९ लाख रुपयांचे देयके अदा करण्यासाठी सूचना शिक्षण विभागाच्या आहे. त्यानुसार दौरा महत्त्वाचा होता, परंतु या दौऱ्यात ठेकेदाराचे बिंग बचतगटाच्या महिलांनी फोडले.

पोत्यांची तपासणी, देयके स्थगित

१३ ठेकेदारांचे जवळपास दोन कोटी ६९ लाख रुपयांचे देयके काढण्यासाठी समितीमार्फत सेंट्रल किचन शेडची तपासणी करण्यात आली. अंबड (Ambad) येथील आवजीनाथ संस्थेचे किचन तपासण्यात आले. तपासणी दरम्यान महिला बचतगटाच्या काही महिलांनी पंचवटीच्या (Panchavati) हिरावाडी भागातील गुंजाळबाबा नगरमधील श्री स्वामी विवेकानंद सामाजिक सेवा विकास संस्थेच्या गोडाऊन येथे अधिकाऱ्यांसमवेत भेट दिली तेथे गुदामाशेजारील बंगल्यात तांदळाची पोती आढळून आली. समर्थ महिला बचतगट, श्रध्दा महिला बचतगट, आई तुळजा भवानी बचतगट, आम्रपाली महिला बचतगट, करम महिला बचतगट, चक्रधर महिला बचतगटाच्या सुषमा शिरसाट, सरला चव्हाण, अलका शिरसाट, माया पगारे यांनी गोडाऊनमधील तांदळाची माहिती अधिकाऱ्यांना दिली. पोते मोजण्याचे काम रात्री उशिरा सुरू होते. दरम्यान, आयुक्त कैलास जाधव (NMC commissioner kailash jadhav esakal) यांनी दोन कोटी ६९ लाख रुपये देयके देण्यास स्पष्टपणे नकार दिला.

"स्वामी विवेकानंद सामाजिक शैक्षणिक सेवा संस्थेच्या गोडाऊनच्या आवारात तांदळाची पोती आढळून आली. तेथे पंचनामा करण्यात आला असून यासंदर्भातील अहवाल आयुक्तांना सादर केला जाईल. त्यानंतर कारवाई करू." - सुनीता धनगर, शिक्षणाधिकारी, महापालिका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

RCB Playoffs Scenario : चाहत्यांनो नाराज होऊ नका! RCB प्लेऑफमध्ये पोहोचणार, मुंबईनंतर गुजरातचाही खेळ खल्लास

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

SCROLL FOR NEXT