crime news esakal
नाशिक

Nashik News : भररस्त्यात विद्यार्थ्यावर गावगुंडाकडून शस्त्राने वार

सकाळ वृत्तसेवा

सिडको (जि. नाशिक) : सिडको परिसरात टवाळखोर व गावगुंडांची दहशत कमी होत नसून अंबड पोलिसांचा वचकच राहिला नसल्याचा आरोप स्थानिकांमधून करण्यात येत आहे.

उत्तमनगर परिसरातील महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या युवकाचा घरी जात असताना धक्का लागल्याच्या कारणावरून चार ते पाच जणांच्या टवाळखोरांच्या टोळक्याकडून या विद्यार्थ्याला शिवीगाळ करीत मारहाण करण्यात आली. (student was attacked by village goon Nashik News)

काही प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार सदर विद्यार्थी जीव मुठीत घेऊन धावत असताना हे गावगुंड मात्र हातात हत्यार घेऊन त्याचा पाठलाग करत होते. त्यांनी धारदार शस्त्राने विद्यार्थ्यास गाठत त्याच्यावर हल्ला केला. विद्यार्थ्यांच्या डोळ्याच्या खाली वार झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला.

हा प्रकार भर रस्त्यावर सुरू असल्याने येथे दहा ते पंधरा मिनिटे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. मारहाण करताच गावगुंडानी घटनास्थळाहून पळ काढला. यानंतर मात्र स्थानिक रहिवाशांनी पुढाकार घेत सदर युवकाला खासगी रुग्णालयात दाखल केले.

अंबड पोलिस ठाण्यापासून जवळच असलेल्या घटनास्थळी पोलिस मात्र त्वरित न पोचल्याने पोलिसांच्या कामगिरीबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत अंबड पोलिसात कोणताही गुन्हा दाखल झालेला नसल्याची माहिती कळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Ashok Kharat : कॅप्टन खरातकडून पंचवीस वर्षांपासून अंधश्रद्धेला खतपाणी! 'सकाळ'ने वृत्तमालिकेद्वारे भोंदूगिरीवर टाकला होता प्रकाशझोत

IPL 2026 New Rule : १५ नवीन नियम... BCCIने खेळाडू, त्यांचे कुटुंबिय अन् फ्रँचायझीची डोकेदुखी वाढवली; चुका केल्यास कठोर कारवाई

धुरंधर ते नॅशनल क्रश झालेल्या उझैर बलोचची 'ही' आहे गर्लफ्रेंड, अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट, म्हणाली...'आता दुनिया तुझ्यासाठी...'

Investment: भारतात गुंतवणुकीची क्रांती! 84% भारतीय आणि 56% महिला आता स्वतः घेतात आर्थिक निर्णय

Farsawale Baba Death: गोरक्षकांना मिळणार 'शस्त्र परवाना' आणि विशेष सुरक्षा कवच; काय आहे योगींचा गोतस्करांविरुद्ध 'सीक्रेट' मास्टरप्लॅन?

SCROLL FOR NEXT