Nashik News  esakal
नाशिक

कमाल! विद्यार्थ्यांनी भाजीपाला विक्रीतून केली हजारोंची उलाढाल

सकाळ वृत्तसेवा

येवला : शाळेत खेळण्या बागडण्याच्या वयात पुस्तकी ज्ञानासोबतच व्यवहार काय असतो, आपला माल विक्री कसा करायचा अन् हिशोबाने पैसे कसे कमवायचे याचा अनुभव देण्यासाठी कोटमगाव विठ्ठलाचे (ता.येवला) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बाजार भरला होता. या बाजारात पालक हे गिऱ्हाई झाले अन् मुले भाजीपाला विक्रेते. विद्यार्थ्यांनी भरविलेल्या या बाजारात हजारावर रुपयांची उलाढाल झाली. यानिमित्ताने चिमुकल्यांनी व्यावहारिक ज्ञानाचा अनुभव घेतला.

शाळेत दफ्तर मुक्त मुक्त अभियान अंतर्गत बाल आनंद मेळावा भरला होता. शाळेतील पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी भाजीपाला व इतर पदार्थांची सुमारे चाळीसवर दुकाने व स्टोल लावले. भाजी बाजाराचे उद्घाटन शालेय व्यवस्थापन अध्यक्ष व सदस्य तसेच ग्रामस्यांच्या हस्ते करण्यात आले. या भाजी बाजारात चिमुकल्यांनी पालक, वांगे, बटाटे, टोमॅटो, कोथिंबीर, बीट, पपई, डांगर, भोपळा, वाल, यांसह डोसा, मसालेदार चणे , चहा, गोळ्या, बिस्किटे, चॉकलेट व कुरकुरे यांची दुकाने लावली होती.

हेही वाचा: शेतमजूर ते कॅनाॅल मॅन...जाणून घ्या एक यशोगाथा....

बाजारास गावातील लहान थोर नागरिकांसह महिला व तरुणांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत व खरेदी केल्याने ४ हजारावर उलाढाल झाली. बाजारात चिमुकल्यांकडून भाजीपाला खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी झाली होती.

याप्रसंगी ग्रामस्थांनी आवडीने खाऊचा आस्वाद घेतला. यामुळे विद्यार्थ्यांना गणिती संकल्पना, नफा-तोटा, व्यवहारज्ञान कौशल्य, विद्यार्थ्यांना अनुभवातून शिकायला मिळाले. बाजारात चिमुकले दुकानदार आणि खरेदीदार यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. शाळेच्या मुख्याध्यापिका मंजूषा भोईर, उपक्रमशील शिक्षिका शीतल पावले, भूषण सोनवणे, योगिता जगताप आदींनी या उपक्रमाचे नियोजन केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI,3rd ODI: शाय होपचं दीडशतक अन् वेस्ट इंडिजचा सर्वात मोठा विजय; मात्र भारताने जिंकली मालिका

PM झालो तर काय करेन? संजय दत्तचं मुन्नाभाई स्टाईलने उत्तर, ट्रम्प यांना म्हणाला...'मामू, तुम भटक गए हो' पंतप्रधान मोदींवरही टोलेबाजी

IND vs WI, 3rd ODI मध्ये ड्रामा! गुरनूर ब्रार ओव्हर अर्धवट सोडून मैदानाबाहेर गेला, तर रुदरफोर्डच्या विकेटवरूनही वाद

Beed News : येत्या आठवड्यात कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षक बीडच्या कारागृहात येणार; वादग्रस्त 'कॉल रेकॉर्डिंग' अन् अवैध कारभाराची स्वतः करणार झाडाझडती

Rahul Gandhi MPSC Students Protest : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राहुल गांधींचा पाठिंबा; म्हणाले, ‘आश्वासने नकोत, ठोस कारवाई हवी’

SCROLL FOR NEXT