Students expressing their happiness over availability of water in Zilla Parishad school. esakal
नाशिक

Nashik News : कडनोर वस्तीच्या विद्यार्थ्यांची शिक्षकांमुळे भागली तहान!

सकाळ वृत्तसेवा

सोनज (जि. नाशिक) : जिल्हा परिषदेच्या कडनोर वस्ती (ता. चांदवड) येथील शाळेत शिक्षकांच्या पाठपुराव्यामुळे व पदरमोड करून विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून दिली आहे. (students of Kadnor zp school slum water crisis solved by teachers Nashik News)

या शाळेत अनेक वर्षे सुविधांचा अभाव होता. पाणी, वीज, ई लर्निंगची असुविधा, ना चांगला रस्ता होता. काही दिवसांपूर्वी सरपंच दयानंद अहिरे यांच्या माध्यमातून ५० इंची टीव्ही मिळाला. वीज नसल्याने अनेक समस्या शाळेमध्ये आहेत. विद्यार्थ्यांना पिण्यासाठी, वापरासाठी, स्वच्छतेसाठी पाणी उपलब्ध नव्हते.

शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक लक्ष्मण काळे व सहशिक्षिका मनीषा दुकळे यांनी यावर्षी शाळेमध्ये पाणी मिळण्यासाठी ग्रामपंचायतीकडे वारंवार विनंती केली. त्यावर श्री. अहिरे यांनी एक कुपनलिका व विद्युतपंप बसवून दिला. शाळेतील शिक्षक लक्ष्मण काळे यांनी मित्रांच्या मदतीने व स्वखर्चाने शाळेमध्ये वीज उपलब्ध करून पाण्याची समस्या सोडविली.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

दुर्दैवाने कुपनलिकेचे पाणी येणे बंद झाले. दुसरी कुपनलिका चारशे फूट लांब असताना चारी खोदण्यासाठी जेसीबीचा खर्च सागर बिडगर यांनी देण्याचे आश्‍वासन दिले. पाईप व त्यापुढील खर्च, टाकी ठेवण्यासाठी ओटा, हँडवाश स्टेशन आदींसाठी लागलेला दहा ते पंधरा हजार रुपये खर्च दोन्ही शिक्षकांनी केला.

गवंडी काम करणारे आप्पा अहिरे यांनी कुठलीही मजुरी न घेता विद्यार्थ्यांच्या पाणी पिण्यासाठी मोफत श्रमदान केले. अखेर जुन्या वर्षाला निरोप देताना शाळेत पाणी पोचवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman: रशियन महिला सापडली ते गोकर्णचं घनदाट जंगल... माणूस हरवला की रस्ता ही सापडणार नाही, फोटो पाहा

रशियन महिलेच्या मुलींचे वडील कोण? भारतात का आली होती? मोठे अपडेट समोर

Latest Maharashtra News Updates : आळंदीत रविवारी संत भेटीचा सोहळा, वारकरी संप्रदायाला अनुभवायला मिळणार दुग्धशर्करा योग

Local Elections 2025 : नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप, इच्छुकांचा अभ्यास, जिल्हा परिषद गट-गण प्रारूप रचना; निवडणूक मोर्चेबांधणीला सुरुवात

Kolhapur Chappal Prada : ‘प्राडा’ची टेक्निकल टीम कोल्हापुरी पायतान बघून भारावली, कारागिरांची हस्तकला पाहून म्हणाले...

SCROLL FOR NEXT