While inaugurating the water filter in the secondary school, the former chairman of the market committee Sudhir Jadhav esakal
नाशिक

Nashik News : राजापूरच्या विद्यार्थ्यांना मिळणार शुद्ध पाणी; लष्करी जवानाकडून शाळेला वॉटर फिल्टर

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : राजापूर येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेला जुनीपर ग्रीन एनर्जी प्रा. लि. व परिसरातील माजी विद्यार्थी असलेले लष्करी जवान यांच्यातर्फे ५०० लिटरचे वॉटर फिल्टर भेट देण्यात आले.

यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी पिण्याची सोय झाल्याने पालकांनी आभार व्यक्त केले. (Students of Rajapur will get clean water Water filter to school from military personnel Nashik News)

येथील शाळेच्या अवतीभवती अनेक भौतिक सुविधा आहेत. येथे बोरवेल असून त्याला पुरेसे पाणीही आहे. मात्र, हे पाणी शुद्धरित्या मिळावे यासाठी वॉटर फिल्टरची गरज होती. काही पालक व शिक्षकांच्या या मागणीची दखल घेऊन सैनिकी सेवेत असलेल्या युवकांनी पुढाकार घेतला.

तसेच, येथे असलेल्या ग्रीन एनर्जी या सोलर प्रकल्पाने हातभार लावला. त्यांच्या योगदानाने आता शाळेला शुद्ध पाणी मिळणे सुकर झाले आहे. व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे संचालक तुळशीराम विंचू, विजय सानप, बाजार समितीचे माजी सभापती डॉ. सुधीर जाधव, जुनिपर ग्रीन एनर्जी कंपनीचे व्यवस्थापक सुनील निकम आदींच्या हस्ते या फिल्टरचे लोकार्पण करण्यात आले.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

या वेळी संतोष वाघ, सरपंच शरद आगवण, माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य सुभाष वाघ, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्‍वर दराडे, तालुका भाजपाचे सरचिटणीस दत्ता सानप, शिवसेनेचे आण्णा मुंढे, प्राचार्य एम. एस. पठाण, पर्यवेक्षक डी. पी. थोरे, उच्च माध्यमिक विभागाचे प्रमुख बापूसाहेब दराडे,

पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष शंकर अलगट, माजी मुख्याध्यापक पोपट आव्हाड, समाधान चव्हाण, भारतीय सेना दलातील फौजी बांधव सोन्याबापू वाघ, अनिल वाघ, देविदास वाघ, सुनील वाघ, मेजर साजिद सैय्यद, राहुल जाधव,

सागर वाघ, सचिन वाघ, ज्येष्ठ ग्रामस्थ शिवराम वाघ, महेश आव्हाड, वसंत नागरे, गोरख घुगे, गोरख सानप, अनिल वाघ आदी उपस्थित होते. राजेंद्र वाघ यांनी सूत्रसंचालन केले. श्री. कोतकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT