nutritious diet esakal
नाशिक

नाशिक : विद्यार्थ्यांना एप्रिलमध्ये मिळणार 175 दिवसांचा शिधा

विक्रांत मते

नाशिक : वाहतुकीचा ठेका निश्‍चित करण्यात आल्यानंतर पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मागील आठ दिवसांपासून १७५ दिवसांचा कोरडा शिधा देण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. यापुर्वी राज्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना वर्षभर शालेय पोषण आहार ठेका निश्‍चिती अभावी तांदुळ मिळाला नव्हता.

शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा टक्का वाढावा या हेतूने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळांमध्ये मध्यान्ह भोजन दिले जाते. वर्षभर अन्न पुरवठा करण्यासाठी ठेकेदारांची निश्‍चिती होते. वर्षभर पुरवठ्याचे काम चालते. चालु शैक्षणिक वर्षात जुलैमध्ये ठेका संपला होता. एकीकडे ठेक्याची मुदत संपुष्टात येत असताना नवीन ठेकेदार निश्‍चित करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवावी लागते किंवा ठेकेदार निश्‍चित करावा लागतो. परंतू, वाहतुकदार निश्‍चित न झाल्याने ऑगस्ट ते मार्च अखेरपर्यंत विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळाला नाही. एप्रिलसाठी आठ दिवसांपुर्वी वाहतुकदार निश्‍चित झाला असून, त्यानुसार तातडीने पोषण आहार पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला. पोषण आहारात कोरडा शिधा देण्याचे निश्‍चित करण्यात आले. त्यामुळे ऑगस्ट ते मार्च अखेरपर्यंत १७४ दिवसांच्या पोषण आहाराचा कोरडा शिधा विद्यार्थ्यांना शाळांमध्ये देण्याचा निर्णय घेण्यात आला.

शाळांमध्ये आहार

एप्रिलपासून कोरडा शिधा व वाहतुकदार निश्‍चित झाल्याने या महिन्यातील २३ दिवस विद्यार्थ्यांना शाळेमध्येच पोषण आहार शिजवून दिला जाणार आहे. अशी माहिती प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT