Sub-inspector of police and an employee arrested for taking bribe 
नाशिक

लाचखोर पोलिस उपनिरीक्षक, शिपाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

प्रमोद दंडगव्हाळ

सिडको (नाशिक) : दुकानदार महिलेवर खोटा गुन्हा दाखल करून तिला जामीन मिळाल्यावर दहा हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या अंबड पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षकासह शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (ता. २४) रात्री अटक केली.

कैलास सोनवणे (उपनिरीक्षक) आणि दीपक वाणी (शिपाई), अशी लाचखोर पोलिसांची नावे आहेत. दोन दिवसांपासून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग विविध तक्रारीवर कारवाई करत असून, दोन दिवसांत लाचलुचपतने तीन कारवाया करत लोकसेवकांना लाच घेताना पकडले आहे. दरम्यान, अंबड पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक आणि कर्मचाऱ्याला पकडल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. तक्रारदार महिलेचे सिडको भागात कापड विक्रीचे दुकान असून, तिच्यावर उपनिरीक्षक सोनवणे आणि शिपाई वाणी यांनी कठोर कारवाई करण्याची धमकी दिली होती. तसेच ती न्यायालयातून जामिनावर सुटताच या लाचखोरांनी तिच्याकडे १५ हजारांची लाच मागितली. तडजोडीअंती दहा हजार रुपये देण्याचे ठरले. बुधवारी सायंकाळी पथकाने सापळा रचला. दोघेही लाच घेत असताना त्यांना लाचलुचपत विभागाने पकडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara ZP Election: सातारा झेडपी निवडणुकीत इच्छुकांची चढाओढ; ३९ जागांसाठी महायुतीत ‘फिल्डिंग’, राष्ट्रवादी काँग्रेससह सर्व पक्ष मैदानात!

कौटुंबिक वादातून आईने अडीच वर्षांच्या मुलाला पाच लाखात विकलं, धक्कादायक प्रकरण समोर; कुठं घडला प्रकार?

'आई तारी त्याला कोण मारी' डोळ्यात अंगार, हातात कुऱ्हाड ! प्रार्थनाच्या आगामी सिनेमाचं पोस्टर VIRAL

Latest Marathi News Live Update : मनमाड-येवला महामार्गावर टँकरचा अपघात

inspiring Story: ६७ वर्षीय ‘तरुणा’ची कमाल! वर्षभराच्या श्रमदानातून डोंगर खोदून साडेतीन किमी रस्ता तयार, नानांची जिद्द ठरली आदर्श..

SCROLL FOR NEXT