Succes Story Pooja Divate passed the final examination of CA Nashik Marathi News
Succes Story Pooja Divate passed the final examination of CA Nashik Marathi News 
नाशिक

Succes Story : कष्टकरी गिरणी व्‍यावसायिकाची मुलगी झाली 'सीए'; खडतर प्रवासातून गाठले यशाचे शिखर 

अरुण मलाणी

नाशिक : सनदी लेखापाल (सीए) सारख्या अत्‍यंत कठीण परीक्षेत यश मिळविणे तसे आव्‍हानात्‍मकच. अनेक विद्यार्थी वर्षानुवर्षे अभ्यास करूनही यशाची पायरी चढू शकत नाहीत. परंतु, अत्‍यंत सामान्‍य कुटुंबातील पूजा माणिकलाल दिवटे हिने प्रसंगी घरातील स्‍वयंपाकगृहात अभ्यास करत खडतर प्रवास पूर्ण करताना सीएच्‍या अंतिम परीक्षेत यश मिळवत यशाचे शिखर गाठले आहे.

घर छोटे असले तरी स्‍वप्‍न मोठे पाहा...

कष्टकरी गिरणी व्‍यावसायिक असलेल्‍या दिवटेंचे समर्पण, त्‍याग अन् पाठबळामुळे पूजाच नव्‍हे तर तिची मोठी बहिण अन् लहान भावानेही उच्च शिक्षणापर्यंत मजल मारली आहे. जिद्द व चिकाटीच्‍या जोरावर कुठलेही धेय्य अवघड नाही, हे सहउदाहरण दिवटे कुटुंबीयांनी सिद्ध केले आहे. माणिकलाल दिवटे यांचा रविवार कारंजा परिसरात गिरणीचा व्‍यवसाय असून, येथेच दोन खोल्‍यांच्‍या छोट्याशा घरात ते राहतात. घर छोटे असले तरी स्‍वप्‍न मोठे बघावे, अन् या स्‍वप्‍नांचा जिद्दीने पाठलाग करावा हे त्‍यांनी आपल्‍या मुलांना लहानपणापासून शिकविले. वडील माणिकलाल दिवटे आणि आई संगीता दिवटे यांच्‍या परिश्रमांची फलश्रुती झाली असून, पूजा सीए अंतिम परीक्षेत चारशेपैकी २३५ गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे.

अपयशाने खचून न जाता, तयारी सुरुच ठेवली

पूजाचे शालेय शिक्षण सारडा कन्‍या विद्यालयातून झाले. बारावीपर्यंतचे शिक्षण झाल्‍यानंतर सीए शिक्षणाकडे वळण्याचा विचार आला. परंतु, सीए होण्याचा प्रवास सोपा नसेल, ही कल्‍पना तिला होता. कुटुंबाकडून मिळालेल्‍या पाठबळाच्‍या जोरावर तिने तयारीला सुरवात केली. त्‍यातच २०१३ मध्ये सीपीटी या प्रवेश परीक्षेत दोनशेपैकी १४५ गुण मिळविताना नाशिकमधील अव्वल पाच विद्यार्थ्यांमध्ये तिने स्‍थान राखले. या यशाने तिचा आत्‍मविश्र्वास वाढला व आणखी जोमाने अभ्यासाला लागली. दोन खोल्‍यांचे घर असल्‍याने कुटुंबातील अन्‍य सदस्‍य बैठक खोलीत टिव्‍ही बघत असताना, स्‍वयंपाकगृहात पूजा अभ्यासावर लक्ष केंद्रित करत आयपीसीसी परीक्षेत पहिल्‍या प्रयत्‍नात आलेल्‍या अपयशाने खचून न जाता, तयारी सुरुच ठेवली. दुसऱ्या प्रयत्‍नात मात्र तिने यश मिळविले. अंतिम टप्‍यातील सीए फायनल या परीक्षेत नुकतेच तिने यश मिळविले असून, आपल्‍या कुटुंबीयांची स्‍वप्‍नपूर्ती तिने केली आहे.

भाऊ, बहिण दोन्‍ही उच्च शिक्षित

पूजाची मोठी बहिण कल्‍याणी दिवटे हिने औषधनिर्माणशास्‍त्र शाखेतून शिक्षण घेतले असून, ती सहा वर्षांपासून नोकरी करते आहे. तर लहान भाऊ शुभमने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले असून, तो दीड वर्षापासून नोकरी करतो आहे. निकाल जाहीर होताच दिवटे कुटुंबीयांनी जल्‍लोष केला. पूजाला अभिषेक काळे यांच्‍यासह शिक्षकांचे सहकार्य लाभले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT