Amol Bhuvad celebrating his success with his parents esakal
नाशिक

Success Story: कठीण परिश्रमाच्या जोरावर यशाला गवसणी! पोलिस अकादमीतील मुख्य स्वयंपाकीचा मुलगा बनला PSI

सकाळ वृत्तसेवा

Success Story : करियरची निवड करताना अनेक विद्यार्थी चाकोरीबद्ध मार्ग निवडतात. मात्र, बीएस्सी कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेतलेला अमोल अरुण भुवड मात्र यास अपवाद ठरला आहे.

त्याने चाकोरीबद्ध मार्ग न निवडता स्पर्धा परीक्षांचा मार्ग निवडला. सतत मिळणाऱ्या अपयशाने खचून न जाता त्यांनी सतत प्रयत्न करून यश खेचून आणले. अमोलची नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पीएसआय पदावर निवड झाली. (Success achieved through hard work son of chief cook at police academy became PSI nashik)

अमोलचे वडील महाराष्ट्र पोलिस अकादमी, नाशिक येथे मुख्य स्वयंपाकी या पदावर कार्यरत आहेत, त्यांचा मुलगा काही दिवसांनी ते कार्यरत असलेल्या महाराष्ट्र पोलिस अकादमी येथेच प्रशिक्षण घेणार आहे.

ही त्यांच्यासाठी अतिशय गर्वाची गोष्ट आहे. हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता २०१७ मध्ये पहिल्यांदा त्यांनी पीएसआय पदासाठी प्री-लीम, मेन्स, ग्राउंड आणि मुलाखत हे टप्पे पार केले. परंतु ग्राउंड मध्ये कमी गुणांमुळे निवड होऊ शकली नाही.

२०१८ ला ही मेन्स परीक्षेत अपयश आले. २०१९ ला पुन्हा तीनही टप्पे पार केले परंतु, केवळ एक गुणांनी यशाने त्याला हुलकावणी दिली. मात्र या अपयशाने खचून न जाता त्यांनी पुन्हा जोमाने तयारी केली व २०२० च्या पोलिस अकादमी परीक्षेत निवड होत त्यांनी यशश्री खेचून आणली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अमोल मूळगाव ढाकरवाडी (ता. खेड, जिल्हा. रत्नागिरी) येथील असून तेथील पहिलाच पीएसआय होण्याचा मान त्याला मिळाला आहे.

आपल्या यशात आपले आईवडील आणि भाऊ यांचा सिंहाचा वाटा आहे, आपले यशामुळे कुटुंबाची मान उंचावली गेली, याचा आनंद अधिक आहे असे अमोलने सांगितले.

अमोलच्या यशामुळे त्याचे आईवडील अतिशय भारावून गेले होते आणि निकालानंतर आपला मुलगा पीएसआय झाल्याच्या आनंदात त्यांनी आपल्या आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT