mission zero 1.jpg 
नाशिक

"मिशन नाशिक झिरो"ला पहिल्याच दिवशी यश! कोरोना हद्दपार होईपर्यंत मोहीम सुरूच

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गेल्या साडेतीन महिन्यांपासून अहोरात्र झटणाऱ्या प्रशासनातील अधिकारी, वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या मदतीला शहराच्या विविध भागांतील नगरसेवक धावून आल्याने काेेरोनाविरोधातील लढाईला बळ मिळाले. नगरसेवकांनी त्यांच्या पातळीवर राबविलेल्या तपासणी शिबिराच्या माध्यमातून सहा विभागांत पहिल्याच दिवशी ९२ हून अधिक रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांच्यावर तातडीने उपचाराचा मार्ग मोकळा तर झालाच, शिवाय कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास यानिमित्ताने मदत होणार आहे. 

विविध ठिकाणच्या तपासण्यांमध्ये ९२ रुग्ण पॉझिटिव्ह
आतापर्यंत कोरोना रुग्ण आढळल्यानंतर कॉन्टॅक्ट ट्रेसिंग शोधून त्यांच्यावर उपचार केले जात होते. कॉन्टॅक्ट शोधण्यासाठी महापालिकेने ४०० वैद्यकीय पथकांची नियुक्ती केली; परंतु कॉन्टॅक्ट शोधताना अनेक अडचणींना मोरे जावे लागले. कधी भीती, तर कधी गैरसमजातून नागरिक पुढे येत नव्हते. त्यामुळे कोरोनावर मात करण्यातदेखील अडथळा होता. प्रशासनाला नगरसेवकांची मदत हवी होती. नगरसेवकांचा त्यांच्या प्रभागात असलेला जनसंपर्क व नागरिकांचा त्यांच्यावरील विश्‍वास हा धागा पकडून नगरसेवकांना मैदानात उतरण्याचे आवाहन तज्ज्ञांनी ‘सकाळ’च्या माध्यमातून केले होते. त्यानुसार आमदार ॲड. राहुल ढिकले, सीमा हिरे, प्रा. देवयानी फरांदे, महापौर सतीश कुलकर्णी, शिवसेनेकडून विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्यासह नगरसेवक बुधवारी मैदानात उतरले.

प्रशासनाला मिळाले सहाय्य; तातडीने उपचार 

भाजपच्या नगरसेवकांनी नाशिक रोड, सिडको, पंचवटी व मध्य नाशिक विभागात पुढाकार घेत कॅम्प घेतले, तर शिवसेनेने स्वखर्चाने कॅम्प घेण्यास सुरवात केली. राष्ट्रवादीने प्रभाग १६ मध्ये कॅम्प घेऊन प्रशासनाच्या कामात सहभाग घेतला. त्यामुळे एकूण एक हजाराच्या वर नागरिकांच्या तपासणीतून तब्बल ९२ नागरिक पॉझिटिव्ह आढळले. पॉझिटिव्ह आढळणाऱ्यांची आकडेवारी मोठी असली, तरी यातून कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यास मदत होणार आहे. कोरोना नाशिकमधून हद्दपार होईपर्यंत ही मोहीम सुरूच राहणार आहे. 

हेही वाचा >नाशिकला पवार साहेब आल्यानंतर सांगणार काय? कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची अवस्था केविलवाणी.. तर मनसे कोमात!

मोहीम निरंतर 
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मोहीम निरंतर चालणार आहे. महापालिकेची ४०० वैद्यकीय पथके, प्रत्येक प्रभागात नगरसेवकांची स्वतंत्र मोहीम, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहभागाने कोरोनाला हद्दपार करण्यासाठी संपूर्ण शहर एकत्र झाल्याचे चित्र शहरात बघावयास मिळत आहे. 

रिपोर्टर - योगेश मोरे

(संपादन - ज्योती देवरे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Cabinet: महावितरणचे विभाजन होणार; देशातील पहिले AI आयुक्तालय महाराष्ट्रात बांधणार, महायुती सरकारचा ऐतिहासिक निर्णय

Amazon Layoffs : मे महिन्यात 14,000 कर्मचाऱ्यांची कपात! 3 महिन्यांत पुन्हा नोकरकपात; AI मुळे नोकऱ्यांवर संकट?

Latest Marathi News Live Update: MPSC चा निकाल जाहीर, सोलापूरचा विजय राज्यात पहिला

निर्मिती सावंत आता होणार ‘भागूबाई’! सगळ्या गावाची खबर ठेवणाऱ्या व्यक्तिरेखेचा धमाकेदार पोस्टर रिलीज.

Sunetra Pawar Devendra Fadnavis Meeting : सुनेत्रा पवार, पार्थ पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; बारामती पोटनिवडणुकीत भाजपची यंत्रणा सक्रीय

SCROLL FOR NEXT