hybrid rocket take off at tamilnadu. krutika khandbahale & Rutuja Kashid
hybrid rocket take off at tamilnadu. krutika khandbahale & Rutuja Kashid esakal
नाशिक

Success Story: देशातील पहिली हायब्रीड रॉकेट मोहीम यशस्वी; महिरावणी विद्यालयाच्या मुलींची गगनभरारी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन, डॉ. मार्टिन फाउंडेशन आणि स्पेस झोन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने देशातील पहिले ‘हायब्रीड रॉकेट’ मिशन हे देशभरातील सहावी ते बारावीच्या पाच हजार विद्यार्थ्यांनी यशस्वीरीत्या विकसित केले.

त्यात जिल्ह्यातील ज्ञानसाधना शिक्षण प्रसारक संस्थेच्या महिरावणी येथील मातोश्री गि. दे. पाटील माध्यमिक विद्यालयाच्या आठवीतील बालवैज्ञानिक कृत्तिका खांडबहाले आणि नववीची ऋतुजा काशीद या विद्यार्थिनींचा समावेश आहे.

या मुलींनी देशात महिरावणी शाळा व गावाचे नाव उज्ज्वल केले असून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. (Success Story Countries first hybrid rocket mission successful girl students of Mahiravani Vidyalaya nashik news)

रविवारी (ता. १९) तमिळनाडूतील पट्टीपलम् येथून स्पेस झोनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आनंदा मेगलिंगम, तेलंगणचे राज्यपाल तमिलीसाई सुंदरराजन तसेच इस्रोचे शास्त्रज्ञ, डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनचे अध्यक्ष सलीम शेख, महाराष्ट्र राज्य सचिव मिलिंद चौधरी, समन्वयिका मनीषा चौधरी आदींच्या उपस्थितीमध्ये देशभरातील मुलांनी तयार केलेले १५० पिको उपग्रह अवकाशात यशस्वीरीत्या सोडण्यात आले.

यावेळी महिरावणी शाळेच्या कृत्तिका खांडबहाले व ऋतुजा काशीद पालकांसह उपस्थित होते. या मुलांनी तयार केलेले पिको सॅटेलाइट हे आकाशात उंचावर जाऊन काही काळ तेथील माहिती गोळा करू शकणार आहे.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

स्पेस झोन इंडियाचे प्रमुख डॉ. आनंदा मेगलिंगम यांनी सांगितले, की शालेय बाल वैज्ञानिकांसाठी हे व्यासपीठ आहे, जे विद्यार्थ्यांना अंतराळ विज्ञानाचे प्रशिक्षण घेण्यास आणि या क्षेत्रात करियरच्या संधी शोधण्यास मदत करत असते. महिरावणी येथील शाळेच्या या दोन्ही बालवैज्ञानिकांनी शाळेबरोबर गावाचे नाव मोठे केले आहे. कृत्तिका व ऋतुजा यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

"मुलांनी बनवलेल्या ‘पिको सॅटेलाइट’ देशातील पहिला उपक्रम ठरला असून, त्याची जागतिक गिनीज बुकमध्ये रेकॉर्ड होऊन एकूण पाच रेकॉर्ड केले आहे. ही बाब जिल्ह्याच्या तसेच महिरावणी शाळेच्या दृष्टीने गौरवाची बाब आहे." -बाळासाहेब सोनवणे, जिल्हा समन्वयक, डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : ''घरी बसलेले होते म्हणून त्यांना बॉम्बस्फोटातील आरोपी...'', एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

पिता-पुत्रामध्ये होणार होती लढत; पण आता स्वामी प्रसाद मौर्य उमेदवारी अर्ज घेणार मागे? कारण आलं समोर

Latest Marathi News Live Update: पाकिस्तानचे झेंडे चालतील का? याचा बदला तुम्ही वीस तारखेला घ्या- एकनाथ शिंदे

Pune News : कात्रज घाटाचा मुख्य रस्ता खचल्याने धोका; भिलारेवाडी हद्दीत सातारा रस्त्यावरील घटना

Nashik Crime News: शरद पवार यांच्या सभेत 'हात की सफाई'! अज्ञाताने जिल्हाध्यक्षांच्याच गळ्यातील सोन्याची साखळी लांबवली

SCROLL FOR NEXT