Bipin Shinde inspecting the buffaloes in the cowshed esakal
नाशिक

Success Story : पदवीधर बिपीनने साधली दुग्ध व्यवसायातुन प्रगती!

दरमहा खर्च वजा जाता नव्वद हजार रूपयांचे उत्पन्न

एस. डी. आहीरे

Success Story : येथील बिपीन प्रभाकर शिंदे या तरूणाने पदवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता वडिलोपार्जित दुग्ध व्यवसायात स्वत:ला झोकुन दिले.

जिद्द व चिकाटीच्या जोरावर ३५ म्हशी व दहा गाई त्यांच्या गोठ्यात बागडत असुन, रोज तीनशे लिटर दुधाचा रतीब घालण्यासाठी बिपीन स्वत: शहरात फिरतात. (Success Story Graduate Bipin made progress in dairy business nashik news)

गायी-म्हशींचे नियोजनबद्ध संगोपन, आरोग्याची काळजी, मुलाप्रमाणे सांभाळ करत शिंदे कुटुंबियांच्या तिसऱ्या पिढीने दुग्ध व्यवसायात प्रगती साधली. महिन्याकाठी खर्च वजा जाता साधारणत: ९० हजार रूपयांचे उत्पन्न श्री. शिंदे मिळवित आहेत.

७५ वर्षांपुर्वी किसन शिंदे यांनी जोडधंदा म्हणुन तीन गाईंच्या माध्यमातुन दुग्ध व्यवसाय सुरू केला. पुढे त्यांचे पूत्र प्रभाकर यांनीही हा व्यवसाय कायम राखला. आता तिसरी पिढी पशुधन पालनातुन दुग्ध व्यवसायाची परंपरा अधिक जोमाने पुढे नेताना दिसत आहे.

बिपीन शिंदेंनी कला शाखेची पदवी घेतली. पण, नोकरीऐवजी त्यांनी पारंपारिक दुग्धव्यवासाय पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. १९९७ पासुन, म्हणजे तब्बल २६ वर्षांपासुन ते या व्यवसायात आहेत.

पिंपळगांवच्या राममंदीर परिसरात निवासस्थानालगतच त्यांचा प्रशस्त गोठा आहे. त्यात मुरा व जाफरा जातीच्या ३५ म्हशी, तसेच जर्सी जातीच्या दहा गायी आहेत. पहाटे चारपासून त्यांचा दिवस सुरू होतो.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

ते स्वत: दोन कामगारांच्या मदतीने गोठ्यातील शेण उचलणे, स्वच्छता, दुधाच्या धारा काढणे व सकाळ-सायंकाळी एकुण तीनशे लिटर दुधाचा रतीब मोटारसायकलद्वारे घालतात. त्यातुन महिन्याला गायी-म्हशींचे औषधोपचार, खुराक, कामगारांचा पगार हा खर्च वजा जाता नव्वद हजार रूपयांचे उत्पन्न त्यांना मिळते.

याशिवाय दरवर्षी ५० ते ६० ट्रॉली शेणखत मिळते. त्याच्या विक्रीतुनही वर्षाकाठी दोन लाख रूपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळते. जनावरांना खाद्य देण्याचे सुनियोजीत व्यवस्थापन शिंदे हे स्वत: करतात. दुधवाढीसाठी दुभत्या जनावरांना दिवसातुन दोन वेळा हिरवा चारा, सरकी पेंड, मका असा खुराक दिला जातो. दुधातील चांगल्या फॅटमुळे मागणी वाढत असल्याचे ते सांगतात.

"दुग्ध व्यवसायात चिकाटी गरजेची असून, रोज पहाटे चारला माझा दिवस सुरू होतो. दुध काढणे व त्यांचे वितरण असा सकाळ-सायंकाळचा दिनक्रम आहे. दुधाची मागणी वाढत असल्याने वर्षभरात आणखी दहा म्हशी विकत घेणार आहे."

-बिपीन शिंदे, दुग्ध व्यवसायीक, पिंपळगांव बसवंत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Metro News: मेट्रो प्रवाशांसाठी मोठी बातमी! 'या' दोन लाईनवरील रेल्वे सेवेच्या वेळेत बदल; कधी आणि का? जाणून घ्या...

विराट कोहली - रिषभ पंत BCCI चा नियम पाळणार! वनडे स्पर्धा खेळणासाठी संभावित संघात निवड

Mundhwa Land case: शीतल तेजवाणीचं आणखी घर आणि कार्यालय असण्याची शक्यता; पोलिसांच्या हाती काय लागलं?

Pune Protest : लोकमान्यनगर पुनर्विकासातील अनिश्चिततेविरोधात नागरिकांचा संताप उसळला; “हक्काचं घर” वाचवण्यासाठी जोरदार आंदोलन!

Maharashtra GST Strike : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीनंतरही जीएसटी अधिकाऱ्यांचे आंदोलन सुरूच

SCROLL FOR NEXT