girish mahale esakal
नाशिक

Success Story : इन्शीच्या गिरीशची आकाश भरारी!; आदिवासी कुटुंबातील युवक बनला पायलट

रवींद्र पगार

कळवण (जि. नाशिक) : तालुक्यातील इन्शी येथील आदिवासी कुटुंबातील गिरीश महाले याने आपल्या कर्तृत्वाच्या बळावर पायलट होत नवे आकाश गाठले आहे. नाशिक येथे वास्तव्य करणाऱ्या तसेच, सहकार खात्यात लेखापरीक्षक पदावर काम करणारे मुरलीधर दोधा महाले यांचा गिरीश हा मुलगा आहे. (Success Story inshi Girish youth from tribal family become pilot nashik news)

गिरीशने नाशिकमधील महाविद्यालयामधून बारावी विज्ञान केल्यानंतर वैद्यकीय, अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र व इतर शाखेच्या पुढील शिक्षणाकरीता न जाता कमर्शियल पायलट होण्याचे ठरवले. मुळात गिरीश अत्यंत हुशार असल्यामुळे नवा मार्ग स्वीकारून पायलट होण्याचे निश्‍चित केले.

शिक्षकांचे मार्गदर्शन, प्रखर बुद्धिमत्ता आणि सर्वांच्या प्रोत्साहनातून देशात एकमेव असलेल्या शासकीय इंदिरा गांधी राष्ट्रीय उडाण अॅकॅडमी, रायबरेली (उत्तर प्रदेश) या संस्थेत परीक्षा व मुलाखतीत पहिल्याच प्रयत्नात यश संपादन करून त्याने प्रवेश मिळवला. विमान उड्डाणाचे प्रशिक्षण उत्तम पार पाडले.

हेही वाचा : आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

प्रथम श्रेणीचे गुण संपादित करून शिक्षण पूर्ण केले. गिरीशची त्याच्या तुकडीमध्ये उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी पायलट म्हणून प्रथम क्रमांकाने निवड झाली. त्याच्या या यशाबद्दल मुंबई टाटा मेमोरियल ट्रस्टने पंचतारांकित हॉटेलमध्ये सत्कार करुन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. हा सन्मान आदिवासी कोकणा समाजाच्या मुलाला पहिल्यांदा प्राप्त झाल्याचे नमूद केले आहे. त्यानंतर गिरीशची इंडिगो एअर लाइन्समध्ये निवड झाली.

इंडिगोच्या वतीने गिरीशने विमान उड्डाणाचे विशेष प्रशिक्षण सिंगापूर येथे पूर्ण केले. गिरीशच्या या निवडीचे कळवण आणि नाशिकमधील सर्वच आदिवासी बचाव अभियान, मित्र परिवार, नातेवाईक व हितचिंतकांनी त्याचे अभिनंदन केले आहे. गुरूवारी दळवट येथे आमदार नितीन पवार यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला.

"सध्याच्या काळात तरुणांना करिअरसाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. पारंपरिक करिअरमागे धावण्यापेक्षा वेगळ्या पर्यायांचा शोध घेतल्यास नक्कीच चांगला वाव आहे. ग्रामीण भागातील तरुणांनी कुठलाही न्यूनगंड न बाळगता जिद्दीने प्रयत्न केल्यास हमखास यश मिळते."

- गिरीश महाले, पायलट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

डॉक्टर युवती प्रकरणात रणजितसिंहांचा संबंध नाही: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; विरोधकांनी राजकारण केले, काय म्हणाले?

Barack Obama : बराक ओबामा यांच्या आवडत्या गाण्यांची 'प्ले लिस्ट' समोर...संत ज्ञानेश्वर माऊलींच्या 'या' प्रार्थनेचा समावेश

Latest Marathi News Live Update :मिरा रोड मध्ये भाजपाला मोठा धक्का, भाजप जिल्हा महामंत्री संदीप तिवारी सोडली भाजपाची साथ

Viral Video: म्हशीच्या पिल्लाचेही दात घासले पाहिजेत! चिमुकलीच्या निरागस कृतीने जिंकली नेटीझन्सची मनं, पाहा व्हायरल व्हिडिओ

Rohit Sharma : रोहितसोबत 'डबल गेम'! BCCI ने विजय हजारे ट्रॉफीत खेळण्याची केलीय सक्ती; मुंबई संघाने डावलले, संभाव्य यादीत नाव नाही

SCROLL FOR NEXT