A scene from the movie 'Girki' directed by Kavita Dater. esakal
नाशिक

Success Story : Pune Film Festivalमध्ये नाशिकची मोहोर! कविता दातीर यांच्या ‘गिरकी’ चित्रपटाची निवड

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पुणे येथे गुरुवार (ता.२) पासून सुरू होणाऱ्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (पिफ) मध्ये येथील युवा दिग्दर्शिका कविता दातीर यांच्या ‘गिरकी’ या मराठी चित्रपटाची निवड झाली आहे. ९ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात यंदा विविध सत्रांमध्ये राहुल रवैल, अरुणा राजे, जॉनी लिव्हर व विद्या बालन आदी कलाकार सहभागी होणार आहेत. (Success Story Nashik success in Kavita Datar marathi movie Girki selected at Pune Film Festival nashik news)

महाराष्ट्र शासनाच्या या अधिकृत महोत्सवात वर्षभरात तयार झालेल्या मराठी चित्रपटांपैकी सर्वोत्तम सात चित्रपट या महोत्सवात स्पर्धेसाठी निवडले जातात. त्यात गिरकी या चित्रपटाचा यंदा समावेश झाला असून, या निमित्ताने नाशिकच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

गिरकी हा ९५ मिनिटे लांबीचा चित्रपट असून, त्याच्या लेखन व दिग्दर्शनाची बाजू दातीर यांनी सांभाळली आहे. दातीर या कवयित्रीदेखील असून, त्यांचा ‘कविताच्या कविता’ हा पहिला कविता संग्रह २०१३मध्ये प्रसिद्ध झालेला आहे. तर, ‘काळोख उलटून टाकताना’ हा कविता संग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे.

त्यांच्यासोबत त्यांचे वडील भगवान दातीर यांनीदेखील चित्रपटासाठी कार्यकारी निर्माता म्हणून काम सांभाळले आहे. भगवान दातीर हे पंजाब नॅशनल बँकेतील निवृत्त कर्मचारी आहेत. गिरकी चित्रपट साकारणे हे कमालीचे आव्हानात्मक होते. याचे पहिले कारण म्हणजे चित्रपटाचे लोकेशन्स.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

ही अशी पहिलीच मराठी फिल्म आहे, जिचे संपूर्ण चित्रीकरण हे एक्सटेरिअर लोकेशन्सवर करण्यात आलेले आहे. संपूर्ण चित्रपटात एकही इंटेरियर शॉट नाही. या प्रकारचे शूटिंग हे संपूर्णतः निसर्गावर अवलंबून असते. त्यामुळेच अनेक अर्थाने ते मानवी नियंत्रणाबाहेर असते. तर, दुसरे महत्त्वाचे कारण आहे, पात्रांची संख्या.

हा फक्त दोन पात्रांचा चित्रपट आहे. याही अर्थाने हा मराठीमधला पहिलाच प्रयोग आहे. पात्र संख्या मर्यादित ठेवूनसुद्धा चित्रपट रटाळ होऊ न देणे, हे अतिशय मोठे आव्हान होते, असे दातीर यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यातील दीड लाख शिक्षकांचा थांबणार पगार! वेतन अधीक्षकांचे शाळांना आदेश; कागदपत्रे अपलोडसाठी १५ सप्टेंबरची मुदत; ‘टीईटी’ संदर्भातील अपडेट काय? वाचा...

सोलापुरात आयटी पार्क होणारच! दरवर्षी येथे तयार होतात ६८०० इंजिनिअर, विमानसेवा सुरू, रेल्वे, महामार्गांची कनेक्टिव्हीटी, उजनी धरणात मुबलक पाणी, सुपर टॅक्स माफ, हायस्पिड इंटरनेटही

आजचे राशिभविष्य - 9 सप्टेंबर 2025

OBC Struggle Committee:'ओबीसी संघर्ष समितीचा साताऱ्यात मोर्चा'; सरकारविरोधात घोषणाबाजी, मराठा आरक्षणाचा निर्णय मागे घेण्याची मागणी

चयापचय दर वाढवण्यासाठी...

SCROLL FOR NEXT