Lieutenant Pranav Patil
Lieutenant Pranav Patil esakal
नाशिक

Success Story : नांदगावचा प्रणव पाटील 22 व्या वर्षी बनला लेफ्टनंट!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नांदगाव येथील प्रणव पाटील २२ व्या वर्षी सैन्यदलात लेफ्टनंट पदावर रुजू झाला आहे. त्याचे शिक्षण जयपूरच्या आर्मी पब्लिक स्कूलमध्ये झाले. बारावीनंतर खडकवासला (पुणे) येथील एनडीएत निवड झाली. तेथे तीन वर्ष प्रशिक्षण घेतल्यानंतर एक वर्ष डेहराडूनच्या आयएमएत प्रशिक्षण पूर्ण करून १० डिसेंबर २०२२ रोजी त्याची लेफ्टनंटपदी नियुक्ती झाली. (Success Story Pranav Patil of Nandgaon became lieutenant at age of 22 nashik news)

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

प्रणवचे वडील प्रताप पाटील २० वर्षे भारतीय नौदलात कार्यरत होते. ते स्वतः बी. टेक आहेत. सध्या मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिस येथे गॅरिसन इंजिनिअर पदावर अहमदनगर येथे कार्यरत आहेत. आई वैशाली पाटील एमएस्सी, बीएड आहेत.

लहानपणापासूनच घरात शैक्षणिक व भारतीय सैन्य दलाबद्दल अनुकूल वातावरण मिळाल्याने त्यांनी भविष्यात संरक्षण खात्यात जायचे, असा निश्‍चय केला होता. देशसेवेसाठी प्रणवने मिळवलेल्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. युवक देशाची शक्ती आहे. अधिकाधिक युवकांनी देशसेवेसाठी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रवणने केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: ''तू निवडून कसा येतो तेच बघतो'' अजित पवारांनी धमकी दिलेल्या 'त्या' तीन उमेदवारांचं काय झालं?

Mukesh Ambani: मुकेश अंबानींचा मेगा प्लॅन! नवी मुंबईत घेतली 3,750 एकर जमीन; इतक्या हजार कोटींची झाली डील

Ind vs Ire : ओपनिंगपासून ते मिडल ऑर्डरपर्यंत बदले टीम इंडियाचे चित्र... जाणून घ्या आयर्लंडविरुद्ध कशी असेल Playing-XI

Sharad Pawar : ''जरांगेंबद्दल माहिती नाही, पण सरकारमध्ये नाराजी होती'', शरद पवारांनी सांगितलं विजयाचं कारण

Nagpur Lok Sabha Election Result : विजयाची हॅट्‌ट्रिक! गडकरींकडून ठाकरे पराभूत

SCROLL FOR NEXT