Prasad Avhad became second registrar esakal
नाशिक

Nashik Success Story: 12 मेन्स दिल्या, पण हार नाही मानली; शिरसगावचा प्रसाद बनला दुय्यम निबंधक!

मुकुंद भडांगे

कोकणगाव : जिद्द आणि चिकाटी असेल तर यश दूर नसतेच. निफाड तालुक्यातील शिरसगाव येथील प्रसाद आव्हाड याने हे सिद्ध करुन दाखवले आहे. अधिकारी बनायचंच ह्या हेतूने बारा वेळा महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या पदासाठी मेन्स दिल्या.

पण, प्रत्येकवेळी अपयश हुलकावणी देत गेले. शेवटी यश पायाशी लोटांगण घालत आले. दुय्यम निबंधक परिक्षेत अनुसूचित जाती प्रवर्गातून प्रसाद राज्यात दुसरा आला आणि सर्वांचाच आनंद गगनात मावेनासा झाला. (success story Prasad Avhad became second registrar nashik news)

निफाड तालुक्यातील शिरसगाव येथील प्रसाद प्रकाश आव्हाड हा शेतकरी कुटुंबातील. प्राथमिक शिक्षण सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण एकलव्य आश्रमशाळेत झाले. पाचवी ते आठवीचे माध्यमिक शिक्षण शिष्यवृत्ती मिळवून देवळ्यातील विद्या निकेतनमधून झाले. तर नववी ते बारावीचे शिक्षण दिंडोरी तालुक्यातील जवाहर नवोदय विद्यालयातून झाले. २०१४ साली पुणे येथील महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतून पेट्रोलियम इंजिनिरिंगचे पदवीचे शिक्षण घेतले.

शासकीय सेवेत जाण्याची इच्छा असल्याने प्रसादने २०१५ ला एलआयसीची मुलाखत दिली. २०१६ साली पोलीस उपनिरीक्षक पदासाठी मुलाखत, २०१७ ला पोलीस उपनिरीक्षक पदाची मुख्य परीक्षा, २०२० ला राज्य सेवा मुख्य परीक्षा, याच वर्षी पुन्हा पोलीस उपनिरीक्षक पदासाठी मुलाखत, २०२१ ला राज्य सेवा मुख्य परीक्षा, २०२१ तसेच २०२२ साली वनसेवा मुख्य, २०२२ ला दुय्यम निबंधक, याच वर्षी राज्य कर निरीक्षक परीक्षा आणि पोलीस उपनिरीक्षक, २०२३ ला पोलीस उपनिरीक्षक पदासाठी मुख्य परीक्षेस पात्र ठरल्यानंतर यश हुलकावणी देत गेले.

अखेर २१ डिसेंबर २०२३ रोजी यशाचा सूर्य उगवला अन् अनुसूचित जाती प्रवर्गातून दुय्यम निबंधक (वर्ग - २ अधिकारी) पदाला गवसणी घालत राज्यात दुसरा क्रमांक मिळविला. प्रसादच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

"आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केले हीच माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. ह्या ९ वर्षाच्या प्रवासात कित्येक वेळा अपयशी झालो, पण आई-वडील, भाऊ, वहिनी यांनी धीर दिला, कायम पाठीशी राहिले म्हणून हे श्रेय सर्वस्वी त्यांचेच आहे. वडील कायम सांगायचे, आपल्या हातात प्रयत्न करणे आहे, समय से पहले भाग्य से अधिक किसिको कुछ नही मिलता. सातत्य हेच यशाचे गुपित आहे, यशाला शॉर्टकट नसतो. - प्रसाद आव्हाड

"मला अभिमान हाच आहे की, त्याने आदिवासी भागात शिक्षण घेऊन जे यश मिळवले, हे आमच्यासाठी मोलाचे व प्रेरणादायी आहे." - सुनंदा आव्हाड(आई)

"एमपीएससी मधून अधिकारी व्ह्यायचे माझे स्वप्न मुलाने पूर्ण केले हीच माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्याने आव्हाड परिवाराचे तसेच गावाचे नाव उज्ज्वल केले, यापेक्षा अजून काय पाहिजे." - प्रकाश आव्हाड (वडील)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT