Rahul raised the issue of stalled appointment due to Maratha reservation to Chief Minister Eknath Shinde at mumbai  esakal
नाशिक

Success Story: वडिलांची स्वप्नपूर्ती करत तो बनला PSI! MPSC उत्तीर्ण झाल्यानंतर राजापूरच्या राहुलने दिलेल्या लढ्याला यश

प्रबळ इच्छाशक्ती, यशाचा ध्यास अन्‌ कठोर मेहनतीला आत्मविश्वासाची जोड मिळाली, की कुठलीही परिस्थिती यशाच्या आड येत नाही, हे दाखविले आहे राजापूर येथील राहुल उगले या युवकाने.

संतोष विंचू

येवला : प्रबळ इच्छाशक्ती, यशाचा ध्यास अन्‌ कठोर मेहनतीला आत्मविश्वासाची जोड मिळाली, की कुठलीही परिस्थिती यशाच्या आड येत नाही, हे दाखविले आहे राजापूर येथील राहुल उगले या युवकाने.

एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली. मात्र, मराठा आरक्षणामुळे नियुक्ती रखडल्याने या प्रश्नी सतत दिलेल्या लढ्याला यश आल्याने राहुलची या पदावर वर्णी लागली आहे. (Success Story Rajapurs rahul ugale become PSI struggle after passing MPSC comes to end nashik news)

राहुलचे वडील प्रकाश उगले राजापूर गावातील पहिले सैनिक होते. १७ वर्ष देशसेवा करून त्यांनी समाजापुढे आदर्श ठेवला. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत राहुलने सेवेचा मार्ग स्वीकारून पोलिस दलात नोकरीला गवसणी घातल्याने सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे.

नोकरीनिमित्त उगले कुटुंबीय राजापूर येथे स्थायिक झाले. येथेच चार भावंडांनी कुटुंबाला आकार दिला.

वडिलांनी प्रामाणिकपणे केलेली देशसेवा आणि आईने काबाडकष्ट करून मुलांच्या शिक्षणासाठी घेतलेली काळजीची जाणीव ठेवत राजापूर येथे दहावीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर मनमाड येथे पदवी मिळवून राहुलने पोलिस उपनिरीक्षक होण्याचे ध्येय मनाशी बाळगले.

मोठे स्वप्न पाहण्याची सुरवात बारावीत शिकत असतानाच झाली. विद्यार्थीदशेत असताना, सर्वच गुरुजनांनी छोट्या छोट्या यशामध्ये शाबासकीची थाप दिली, ती ऊर्जा कायम सोबत असायची.

या ऊर्जेला योग्य दिशा देऊन आपण स्पर्धा परीक्षेत यश मिळवू शकतो, ही खात्री त्यामुळे पटली आणि अभ्यासाचा प्रवास सुरू झाला.आईवडिल, भाऊ व कुटुंबाने साथ दिल्यामुळे कुठलीही अडचण निर्माण झाली नाही.

स्पर्धा परीक्षेचा अर्ज भरताना मला माझी लढाई जिंकायचीच आहे, हाच एक विचार मनात ठेवून वाटचाल सुरू केली. एखादी गोष्ट मनापासून केली की माणूस यशस्वी होतो, हाच अनुभव मी घेतल्याचे राहुल सांगतो.

२०२० मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झाल्यानंतर राहुलची स्वप्नपूर्ती झाली होती. पोलिस उपनिरीक्षकपदावर निवड झाल्यावर सुरवातीला कोरोनाचा अडथळा आला.

त्यानंतर एसईबीसी आरक्षणाचे प्रकरण न्यायालयात गेले अन्‌ ६५ उमेदवारांच्या नियुक्ती रखडल्याने पुन्हा संघर्षाची वेळ आली, पण यावरही न थांबता राहुलने थेट मुख्यमंत्र्यापर्यंत दाद मागितली. नशिबाने पुन्हा साथ दिल्याने हा प्रश्न मार्गी लागला.

परीक्षेच्या जाहीर झालेल्या गुणवत्ता यादीत राहुलने स्थान मिळविले. त्याची उपनिरीक्षकपदावर नियुक्ती झाली आहे. प्रशिक्षणासाठी तो नाशिक येथील अकादमीत गेला आहे.

"वडिलांनी प्रामाणिकपणे देशसेवा केली. आपणही समाजाची सेवा करावी, या विचारातून पोलिस उपनिरीक्षकपदाची परीक्षा दिली अन्‌ यश आले. जिद्द, मेहनत, चिकाटी, सातत्य, आत्मविश्वास या पंचसूत्रीचा विचार करून प्रामाणिकपणे अभ्यास केला, तर यश हमखास मिळू शकते. त्यामुळे तरुणांनी स्वप्नपूर्तीसाठी प्रामाणिक प्रयत्न करायला हवेत."-राहुल उगले, पोलिस उपनिरीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA, 2nd Test: भारताविरुद्ध स्टब्सचं शतक ६ धावांनी हुकलं, पण द. आफ्रिकेने विजयासाठी ठेवलं भलंमोठं लक्ष्य

Viral VIdeo : लग्नातून नोटांचा हार घेऊन पिकअप व्हॅनने पळाला चोर, नवरदेवाने स्पायडर मॅन बनून शिकवली जन्माची अद्दल, थरारक व्हिडिओ

Smriti Mandhana Video : "लग्न थांबवण्याचा निर्णय स्मृती मानधनाचा नाही पलाशचा!", 'अंदरकी बात' पलाशच्या आईनेच सांगितली...

Tata Sierra Launch : 22 वर्षानंतर लेजन्ड कारची पुन्हा एंट्री; टाटाने लॉन्च केली बहुप्रतीक्षित Sierra, किंमत अन् दमदार फीचर्स पाहा

सचिन तेंडुलकरच्या प्रेमात होती 'या' मराठी सुपरस्टारची बायको; प्रपोज करण्याचाही केलेला प्लॅन पण अभिनेता मध्ये आला अन्...

SCROLL FOR NEXT