While felicitating Poonam Borse, Sarpanch Narendra Sonwane, Assistant Police Inspector Manoj Pawar etc. esakal
नाशिक

Success Story: रिक्षा चालकाची लेक झाली डॉक्टर! प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्वप्न केले साकार

सकाळ वृत्तसेवा

वैभव सोनवणे : सकाळ वृत्तसेवा

Success Story : मनाशी पक्क ठरवले तर काहीही अशक्य नाही, परिस्थिती शिक्षणाच्या आड येत नाही याचे उदाहरण म्हणजे वडेल (ता. मालेगाव) येथील रिक्षा चालकाची कन्या हिने डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार केले आहे.

डॉ. पूनम श्‍याम बोरसे असे तिचे नाव आहे. वैद्यकीय शिक्षण चांगल्या गुणांनी पूर्ण केल्यानंतर तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. (Success Story Rickshaw driver became doctor Dreams come true by overcoming adversity nashik)

कुटुंबाच्या चरितार्थासाठी वडेल ते मालेगाव रिक्षा चालविणारे श्‍याम सुकदेव बोरसे यांची पूनम ही कन्या आहे. तिने नुकतीच बीएचएमएस. पदवी प्राप्त केली आहे. यामुळे गावाने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

डॉक्टर दिनी वडेल ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच नरेंद्र सोनवणे, वडनेर खाकूर्डी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज पवार यांनी पूनम हिचा सत्कार केला.

लहानपणापासून अभ्यासात हुशार असलेल्या पूनमने डॉक्टर बनून रुग्णांची सेवा करण्याचे ध्येय मनाशी बाळगले यासाठी अभ्यासाची तयारी तिने ठेवली.

वडेलच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तिचे प्राथमिक शिक्षण झाले. केबीएच विद्यालयात चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर तिने अकरावी, बारावीचे शिक्षण श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम गुरुकुल चांदवड येथे पूर्ण केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

येथूनच तिला वैद्यकीय शिक्षणाची गोडी निर्माण झाली. स्वामी विवेकानंद आयुर्वेद मेडिकल कॉलेज श्रीगोंदा येथे तिला बीएचएमएससाठी प्रवेश मिळाला. वैद्यकीयच्या सर्व वर्षांचे शिक्षण तिने यशस्वीरीत्या पूर्ण करून डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार केले.

मुलगी डॉक्टर झाल्याने आई वडील व कुटुंबीयांच्या आनंदाला उधान आले आहे. वडिलांनीही मुलीच्या कष्ट व परिश्रमाचे चीज झाले. माझी मेहनत फळाला आली असे मत व्यक्त केले.

"पूनमने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत विविध अडीअडचणींवर मात करत वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. गावासाठी ही अभिमानास्पद बाब आहे. अन्य तरुणींनी तिचा आदर्श घ्यावा. परिस्थितीवर मात केल्यास दगडालाही पाझर फुटतो हे तिने अभ्यासातून सिद्ध केले. ग्रामस्थांतर्फे तिचा सत्कार केल्याने अन्य तरुणींनाही त्यापासून प्रोत्साहन मिळेल हा हेतू आहे."

- नरेंद्र सोनवणे, सरपंच, वडेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump ultimatum : ट्रम्प यांचा हमासला ४८ तासांचा अल्टिमेटम! ; म्हणाले, ‘’आता जर ऐकलं नाहीतर...’’

Pune Crime : कुख्यात गुंड नीलेश घायवळचा पासपोर्ट रद्द करणार - पोलिस आयुक्त अमितेश कुमार

Mehbooba Mufti Statement : ‘’लडाख, POKमध्ये Gen-Z… ’’ ; मेहबूबा मुफ्तींनी केलं मोठं विधान!

Gautami Patil News : गौतमी पाटीलच्या अडचणी वाढणार? ; पुणे पोलिसांनी बजावली नोटीस!

IND vs AUS: विराट कोहली आणि रोहित शर्माचे पुनरागमन होणार? ऑस्ट्रेलियाविरुद्ध ODI मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा कधी? तारीख आली समोर

SCROLL FOR NEXT