More grandparents and family members, Major Anil Vare etc. are celebrating Rohini Barde's selection as a police officer. esakal
नाशिक

Success Story: आदिवासी कुटुंबाच्या कष्टमय प्रवासाचे चीज; नात पोलिस झाल्याने आजी- आजोबांच्या आनंदाला उधाण

सकाळ वृत्तसेवा, सुदाम गाडेकर

Success Story : येथील आदिवासी, मेंढपाळ व्यवसाय करणाऱ्या मोरे कुटूंबाची नात रोहिणी दिलिप बर्डे हिची नुकतीच मुंबई पोलिस दलात निवड झाली. मेहनत, काबाडकष्ट करणाऱ्या आजी-आजोबांचे स्वप्न तिने साकार केले आहे. (Success Story tribal family Grandma and grandpas joy overjoyed by granddaughter rohini becoming police officer nashik news)

रोहिणी बर्डे हिचे मूळ गाव निमगाव (ता. राहाता) असून कौटुंबिक हलाखीची परिस्थिती- दारिद्र्य वडील दिलीप बर्डे व आई छाया बर्डे मोलमजुरी करतात. त्यामुळे रोहिणीचे आजोबा नामदेव मोरे व आजी रेशीमबाई व मामा मिलिंद मोरे यांनीच रोहिणीचे पालनपोषण नगरसूल येथे केले.

मेंढपाळ व्यवसाय व काबाडकष्ट, मेहनत करून हलाखीच्या परिस्थितीत मोरे कुंटुबियांनी रोहिणीचे पाचवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात पूर्ण केले. येथील कमांडो डिफेन्स करिअर अकॅडमीत सलग तीन वर्षे भरतीपूर्व शिक्षण देखील रोहिणीने घेतले.

तीन वर्षांच्या अथक परिश्रमानंतर रोहिणीची मुंबई पोलिस दलात निवड झाल्याने नगरसूलच्या मोरे कुटुंबाने घेतलेल्या कष्ट, मेहनतीला फळ मिळाले आहेत. मोरे आजी- आजोबांनी कुटुंबातील नात पोलिस झाल्याने स्वप्न साकार झाल्याने आनंद व्यक्त केला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

आदिवासी बांधव कुटूंबातील मुलगी पोलिस झाल्याने येथील कमांडो करिअर अकॅडमीचे संचालक मेजर अनिल वरे व नगरसूल ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.

"मोलमजुरी व मेंढपाळ व्यवसाय करून आजी-आजोबांनी माझे शिक्षण केले. जिद्द व चिकाटीच्या जोरावर पोलिस म्हणून निवड झाली. कुटुंबियांचे स्वप्न साकार झाल्याचे समाधान वाटते." - रोहिणी बर्डे,

"सलग तीन वर्षे संघर्ष करत रोहिणीचे प्रयत्न व कुटुंबियांची साथ व अकॅडमीचे मार्गदर्शन मिळाले म्हणूनच पोलिस पदावर निवड झाली. इतरांनीही रोहिणीचा आदर्श घ्यावा."

- अनिल वरे, सेवानिवृत्त मेजर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trumpet Symbol: शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिलासा! 'तुतारी'बाबत निवडणूक आयोगानं दिला मोठा निर्णय

Pune Politics : बंडखोर नक्की कोणाचा करणार गेम? माघारीसाठी सर्वच पक्षाचे नेते लागले कामाला!

Shrinivas Vanaga: "षडयंत्र रचून माझं तिकीट कापलं"; अज्ञातवासातून घरी परतेलल्या श्रीनिवास वानगांचा गंभीर आरोप

रणबीरमुळे Anushka Sharma ने ‘तमाशा’ चित्रपट सोडला, म्हणाली - हा चित्रपट नाकारला कारण...

घराघरात टीव्ही पोहोचवण्याचं स्वप्न बघणारे BPLचे फाऊंडर टी.पी. गोपालन नांबियार यांचं निधन

SCROLL FOR NEXT