Goddess idols for sale on the occasion of Sharadiya Navratri festival esakal
नाशिक

Navratri Festival 2023: ग्रामीण भागात नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी! देवीच्या मुर्ती तयार; यंदा 30 टक्के वाढ

गोविंद अहिरे

नरकोळ : शारदीय नवरात्रीची सुरुवात १५ ऑक्टोबर (रविवार) पासून होत असल्याने ग्रामीण भागात या उत्सवाची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात असून मूर्तीकरांकडे मुर्ती बुकिंगसाठी गर्दी होत आहे. यंदा मूर्तींमध्ये ३० टक्के वाढ झाली आहे.

नवरात्र उत्सवाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांत दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. देवीचे भक्त तिची पूजा करण्यासाठी वर्षभर शारदीय नवरात्रीची वाट पाहत असतात. (Successful preparations for Navratri festival 2023 in rural areas Prepare idols of goddess 30 percent increase this year nashik)

ग्रामीण भागातील गावागावात या उत्साहाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. शानिवार सर्वपित्री अमावस्या झाल्यानंतर, रविवारी सकाळी मुर्ती आणल्यानंतर देवीच्या नावाने घटस्थापना करून नंदादीप प्रज्वलित करण्यात येणार आहे.

नऊ दिवस मोठ्या भक्तिभावाने ग्रामस्थ महिला हिरीरिने सहभागी होतात. घरातील देव्हाऱ्याजवळ घटस्थापना करण्यात येते, तर पाचव्या माळेपासून पासून घरोघरी चक्रपुजाचे आयोजन करण्यात येते.

आजच्या धावपळीच्या युगात आता, 'एक गाव-एक देवी' या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळतो. बागलाणच्या पश्चिम पट्यातही या उत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त असून ग्रामस्थ आपल्या एकजुटीचे प्रतिक यातून दाखवितात. यंदा मुर्ती कलाकारांकडे नाविण्यपूर्ण मुर्ती तयार आहेत.

मुर्तींचे दर वाढले

गत वर्षापेक्षा यंदा मूर्ती बनवण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे भाव वाढल्याने ३० टक्के वाढ झाल्याचे दिसून येत आहे. वॉटर कलर, पाॅस्टर ऑफ पॅरिसचे भाव वाढल्याने मुर्तीचे भाव वाढले.

असे आहेत मुर्तींचे दर

१००० रू पासून ते १० ते १५ हजारांपर्यंत

घटस्थापना साठी लागणारे टोपली, मातीची बोळकीनारळसह पुजा साहित्य- ९०₹

झेंडूची फुले- ६० ते ७० रू किलो

"मूर्तीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे भाव वाढल्याने यंदा मूर्तींचे दर वाढले आहेत. मुर्ती बुुुकिंगसाठी रोज तरुण मंडळाचे कार्यकर्ते येत आहे. मुर्ती बनविण्यासाठी मोठे श्रम घ्यावे लागतात."- संजय सोनवणे, मुर्तिकार, सटाणा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maruti Cars: जीएसटी कमी झाल्यानंतर अल्टो, स्विफ्ट, डिझायर आणि वॅगनआरची किंमत किती असेल?

Prithvi Shaw : IPL 2026 मध्ये पृथ्वी शॉ CSK च्या ताफ्यात? ऋतुराज गायकवाडची मध्यस्थी? फ्रँचायझीने पोस्ट केला Video

न्यायालये ताकदवान नाहीत, हात बांधलेत असं आम्ही म्हणू का? सरन्यायाधीशांचा सरकारला सवाल

Diabetes in Kids: तुमच्या मुलांना डायबिटीजचा धोका आहे का? 'ही' ८ लक्षणे वेळेत ओळखून घ्या योग्य काळजी

Shivaji Maharaj: पुण्यातील मानाचा पहिला गणपती अन् शिवरायांचं बंधन! ; मावळे मोहिमेवर जाण्याआधी घेत असत बाप्पाचं दर्शन

SCROLL FOR NEXT