The concerned mechanism while distributing free textbooks under Sarva Shiksha Abhiyan at Malegaon. esakal
नाशिक

Nashik School Opening: मालेगाव तालुक्यात शाळा प्रवेशोत्सवाची जय्यत तयारी! मुलांच्या गोडधोड जेवणाचा बेत

सकाळ वृत्तसेवा

Nashik School Opening : जिल्ह्यातील सर्व शाळा आजपासून (ता.१५) सुरू होत आहे. यासाठी दोन दिवसांपासून मालेगाव तालुक्यात शाळांची पूर्वतयारी सुरू आहे.

शाळा प्रवेशोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली असून माध्यान्ह भोजन योजनेत काही शाळांमध्ये गोड धोड पदार्थ, पुरण पोळी, मोतीचूर लाडू, जिलेबी, गोड शिरा अशा जेवणाचा बेत आखला आहे. (Successful preparations for school entrance festival in Malegaon taluka sweet food plan for Children nashik news)

पहिल्याच दिवशी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची बैलगाडी, घोडागाडी आणि उंटावरून मिरवणूक काढा.

गावातील सर्वांना प्रभातफेरीत सहभागी करून घ्या, पहिल्याच दिवशी बालकांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप, गणवेश संचाचे वितरण करण्यासह पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यास पुष्पगुच्छ देऊन कौतुक करण्यात यावे असे नियोजन तालुक्यातील सर्व शाळांमध्ये करावे अशा सूचना प्रभारी गटशिक्षणाधिकारी तानाजी घोंगडे यांनी दिल्या आहेत.

विशेषतः शाळेच्या प्रत्येक कार्यालयासह वर्गखोल्यांची साफसफाई करण्यात येत आहे. शैक्षणिक वर्षाची सुरवात होत असल्याने मुख्याध्यापक व शिक्षक काळजीपूर्वक स्वत:चा वर्ग सुसज्ज करण्यासाठी धडपड करत आहे.

महिनाभराच्या सुट्टी नंतर शालेय आवारासह स्वच्छता गृह, स्वयंपाक गृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, टाक्या स्वच्छ करून घेण्याचा पुढाकार घेतला. बच्चे कंपनीना मोठ्या कालावधीनंतर शाळा सुरू होत असल्याने आनंद झाला आहे. या मोहिमेत मुलांनीही सडा, सारवण, रांगोळी, सजावट करण्यासाठी योगदान दिले.

लोकसहभागातून मोठ्या प्रमाणावर शाळा डिजिटल झाल्या आहेत. कोरोना नंतरच्या काळात खासगी शाळांतील पुन्हा जिल्हा परिषदेच्या शाळेत वळले आहेत. दरम्यान यावर्षी मोठ्या प्रमाणावर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या झाल्या. नव्या मुलांसह अनेक शाळांमध्ये नवीन गुरुजी दाखल झाले आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शाळांमध्ये पहिले पाऊल उपक्रम

प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने नव्याने पहिलीत दाखल होणाऱ्या चिमुकल्यांना आनंद व हर्षोल्हासात शाळेत आणण्याची लगबग जोरात सुरू आहे. 'पहिलं पाऊल' उपक्रमासह गुलाब पुष्प व चॉकलेट देऊन स्वागत.

विविध प्रकारची तयारी अनेक शाळांमधून करण्यात येत आहे. शासनाकडून आलेल्या सूचना व्यतिरिक्त नव्या संकल्पना शिक्षक राबवतात. यामध्ये शासनाच्या विविध योजना, शाळांची नावीन्यपूर्णता अधोरेखित केली आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रवेशाचे डिजिटल फलक, संदेश, व्हिडिओ प्रसारित करून जनजागृती केली आहे.

दृष्टीक्षेपात शाळांची तयारी

पहिली ते आठवी पुस्तक वाटप शाळा ३८३
मराठी माध्यम विद्यार्थी - ४११८८
सेमी इंग्रजी विद्यार्थी - १८४४९
उर्दू माध्यम - ४०८३
एकूण पुस्तक वाटप विद्यार्थी ५६७२०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Ayurvedic Kadha for Winter: थंडीमुळे सर्दी-खोकला आणि अंगही खाजतंय? 'हा' आयुर्वेदीक काढा आहे सुपर इफेक्टिव्ह!

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

Akola Crime : अल्पवयीन चोरट्याकडून २१.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त; घरफोडी प्रकरणाचा वेगवान उलगडा

SCROLL FOR NEXT