Officials felicitating Sudam Gadekar for receiving LIC's International Standard MDRT Award esakal
नाशिक

मेहनतीच्या बळावर सुदाम गाडेकरांची अमेरिका वारी! LICच्या आंतरराष्ट्रीय दर्जाचा MDRT पुरस्कार जाहीर

सकाळ वृत्तसेवा

येवला (जि. नाशिक) : जिद्द, कष्ट करण्याची तयारी आणि प्रामाणिकपणा असेल तर कोणताही सामान्य माणूस मोठी कामगिरी करू शकतो. हे सिद्ध करून दाखवले कोळगाव या छोट्याशा खेडेगावतील शेतकरी कुटुंबातील सुदाम गाडेकर यांनी. (Sudam Gadekar journey to America by hard work LIC International Standard MDRT Award Announced nashik news)

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

भारतीय जीवन बिमा निगमतर्फे दिला जाणारा आंतरराष्ट्रीय दर्जाचा एमडीआरटी बहुमानाचा पुरस्कार येवला तालुक्यातून प्रथमच त्यांनी पटकावला आहे. त्यामुळे त्यांना अमेरिका दौऱ्यावर जाण्याची संधी मिळाली आहे. एमडीआरटी २०२३ हा बहुमान पटकावणारे ते येवला तालुक्यातील प्रथम विमा सल्लागार आहेत. एक सामान्य शेतकरी पुत्र अमेरिका वारी करतोय, ही अभिमानाची गोष्ट आहे.

ग्रामीण भागात दुर्लक्षित करण्यात येणारा जीवन विमा व आरोग्य विमा योजनांचा लाभ अनेक गरजूंना मिळवून देण्यासाठी सुदाम गाडेकर यांनी गेली. सोळा वर्ष त्यांनी कठोर परिश्रम घेतले आहे. भारतीय जीवन विमा निगम मनमाड शाखेचे शाखाधिकारी अरुण सोनवणे, नवीन व्यवसाय विभागाचे अधिकारी अशोक कुक्कर, विकास अधिकारी रोहित पगारे, संजय दारोळे, मनोज वाघ, सुनील वाढवणे, देवेंद्र पगार यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.

मनमाड शाखेतील कर्मचारी, विमाप्रतिनिधी संघटना, व नगरसूल ग्रामस्थांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. मेहनत करण्याची तयारी आणि कामात प्रामाणिकपणा असला की कुठली गोष्ट अशक्य नाही. ग्रामीण भागातील जनतेला विम्याचे महत्त्व सांगितले व त्यांनी विश्वास ठेवल्याने हे उद्दिष्ट पूर्ण करू शकलो असल्याची प्रतिक्रिया गाडेकर यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: 'जरांगे-पाटील यांच्याशी आमचा कवडीचा संबंध नाही'; शरद पवारांनी नाशिकमध्ये दिले स्पष्टीकरण

IND vs PAK : सूर्यकुमार यादव भाजपा प्रवक्ता... Asia Cup मध्ये लाज निघाल्यावर टीम इंडियाच्या कॅप्टनवर पाकिस्तानकडून नको ते आरोप; कोण म्हणतंय असं?

अरे हे चाललंय तरी काय! पुन्हा बदलली झी मराठीच्या लोकप्रिय मालिकेची वेळ? नेटकऱ्यांनीच दाखवला फोटो

Sharad Pawar : ‘महाराष्ट्राची सामाजिक वीण विस्कटली’, आरक्षणावरुन शरद पवारांनी व्यक्त केली चिंता

Hug My Younger Self स्टाईलचा फोटो बनवा एका क्लिकवर..

SCROLL FOR NEXT