death
death e sakal
नाशिक

नाशिककर ‘सडन डेथ’ने चिंतित; मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस अधिक

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत (corona second wave) जिल्ह्याची रुग्णसंख्या आणि मृत्युदर (death rate) वाढला आहे. यात वयस्कर व्यक्ती आणि त्यासोबत तरुणांचाही अचानकपणे मृत्यू होत असल्याची चिंताजनक स्थिती आहे. शहरात अशा मृत्यूचे प्रमाण हे दिवसेंदिवस अधिक होत असल्याचे चित्र आहे. या संदर्भात तज्ज्ञ डॉक्टरांची मते जाणून घेतली असता, त्यांनी वैद्यकीय भाषेत याला ‘सडन डेथ’ असे म्हटले जाते. प्रामुख्याने अचानक मृत्यू होणे, हे काही नवीन नाही; पण त्याचे अल्प प्रमाण असल्याने ते लक्षात येत नव्हते. कोरोनामुळे फुफ्फुसांची कमी होणारी कार्यक्षमता, जुन्या शारीरिक व्याधी, त्याचसोबत कोरोनामुळे हॅपी हायपोक्सियाची लागण बऱ्याच रुग्णांना होते. त्यातून अशा प्रकारे मृत्यू होण्याची दाट शक्यता असते, असे डॉक्टर सांगतात. (Sudden-deaths-rate-is-increasing-in-Nashik-marathi-news)

(report - प्रतिक जोशी)

हॅपी हायपोक्सिया
शरीरात ऑक्सिजनची मात्रा खूप कमी असूनही लोकांना श्वास घेण्यास त्रास होत नाही. हे अत्यंत दुर्मिळ आहे. कोरोनाचा विषाणू फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी करतो. त्यामुळे शरीरातील ऑक्सिजनची मात्रा कमी होऊन कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढते. पण याची लक्षणे दिसून येत नाहीत. त्यामुळे आपल्याला काहीही झाले नाही, असे प्रामुख्याने वाटते. यांसह सिव्हिअर अस्थमा, फुफ्फुसांना झालेली इजा, न्यूमोनिया यामुळे हायपोक्सिया होण्याची शक्यता असते. पण अचानक शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होऊन मृत्यूचा धोका अधिकाधिक वाढतो.
लक्षणे : अशक्तपणा, धाप-दम लागणे, त्वचेचा रंग बदलणं, कफ, हृदयाचे ठोके अचानक वाढणं, जोर-जोरात श्वास घेणं, अचानक खूप घाम येणं.

''कोरोनामुळे शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. एखादी गुठळी हृदयात किंवा फुफ्फुसात अडकली तर मृत्यू होऊ शकतो. मधुमेह, उच्च रक्तदाब यांसह मानसिक ताणतणाव यामुळेसुद्धा अचानकपणे मृत्यूचा धोका वाढतो. यासाठी जीवनशैली बदलावी, योग्य आणि पूरक त्याचबरोबर वेळेत आहार घ्यावा, नियमित व्यायाम करावा.''
-डॉ. स्वप्नील साखला, नारायणी हॉस्पिटल, नाशिक

''अचानक होणारे मृत्यू कोविडशी संबंधित असतीलच असे नाही. यामध्ये अचानकपणे मृत्यू होणे याच्या मागे प्रमुख दोन कारण आहेत. हृदयविकाराचा झटका (हार्ट अटॅक) येऊन अचानक हृदयक्रिया बंद पडणे किंवा मेंदूमध्ये अचानक रक्तस्राव (ब्रेन हॅमरेज) होऊन मृत्यू होतो.''
-डॉ. पंकज राणे, नारायणी हॉस्पिटल, नाशिक

''कोविड आला आणि सडन डेथ व्हायला लागल्या, असे नाही. कोरोनाच्या आधीही असे अचानक मृत्यू होत होते. प्रामुख्याने कोविडमध्ये जी फुफ्फुसांची क्षमता कमी होते त्यामुळे अचानक मृत्यू होऊ शकतात. म्‍हणून नियमित ऑक्सिजन मॉनिटरिंग करणं गरजेचं आहे. कोरोनाचे होम क्वारंटाइन राहून उपचार घेणारे किंवा तसे उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. कारण बऱ्याचदा शरीरातील ऑक्सिजनची पातळी जरी कमी झाली तरी त्याच्या संवेदना जाणवत नाहीत.'' -डॉ. दिनेश वाघ, अशोका- मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक

(Sudden deaths rate is increasing in Nashik)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT