sudhir tambe nashik news  esakal
नाशिक

Sudhir Tambe News: सत्यजित तुमचा कर्जदार, मी ...... : सुधीर तांबे

सकाळ वृत्तसेवा

देवगाव (जि. नाशिक) : शैक्षणिक क्षेत्रातून तरुण पिढीचे भविष्य (Future) घडविले जाते, परंतु त्या क्षेत्राकडे दुर्लक्ष होत असल्याची बाब चिंताजनक आहे. (sudhir tambe statement about satyajeet tambe election winning nashik news)

पदवीधर, कृषी, आरोग्य, उद्योग, बेरोजगारीबरोबर शैक्षणिक क्षेत्रातील प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहे. सत्यजितला तुम्ही भरघोस मतदान करून निवडून दिले, आमदार केले, त्यामुळे सत्यजित हा तुमचा कर्जदार असून त्या कर्जाला मी जामीनदार आहे असे मनोगत माजी आमदार सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांनी येथे व्यक्त केले.

देवगाव येथील श्री. डी. आर. भोसले विद्यालयात आभार दौऱ्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब बोचरे तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच विनोद जोशी, कानळदचे सरपंच शांताराम जाधव, पोलिस पाटील सुनील बोचरे, बापूसाहेब बोचरे, प्राचार्य के. एम. गाजरे, पर्यवेक्षक उगले उपस्थित होते.

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

‘‘छत्तीसगड आणि राजस्थान या राज्यात जुनी पेन्शन योजना लागू झालेली असून त्याच धर्तीवर महाराष्ट्रात ती योजना लागू करण्यासाठी त्या राज्यांत जात आमदार सत्यजित आणि मी अभ्यास दौरा करणार आहे.

आजी आणि माजी असे दोन आमदार तुम्हाला लाभले असून जुनी पेन्शन योजना लागू केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. भाऊसाहेब बोचरे यांनी मनोगतात शालेय परिसरातील भौतिक सोयी सुविधा, अडचणी सोडविण्याची मागणी ताबे यांच्याकडे केली.

प्रसंगी जयेश लोहारकर, मनोहर बोचरे, धनंजय जोशी, अशोक बोचरे, रामनाथ बोचरे, गोपीनाथ मेमाणे, वाल्मिक बोचरे, रवींद्र बोचरे, कचरू बोचरे, गोरख निलख, ज्ञानेश्वर बोचरे, बाळासाहेब मोरे, भाऊसाहेब शिंदे आदीसह ग्रामस्थ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

राजकारणाचा स्तरच घसरला

निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी विधायक कामे करण्यात वेळ दिला पाहिजे, परंतु सध्या राज्यात सुरू असलेले राजकीय नाट्य बघितले तर लोकप्रतिनिधींची तू-तू ,मै-मै करण्यातच वेळ जात आहे.

संसदीय कार्यपद्धतीत लोकप्रतिनिधीचा असलेला उद्देशच सफल होताना दिसत नाही. सध्याची राजकीय परिस्थिती बघितली तर राजकारणाचा स्तरच घसरला असल्याची खंत माजी आमदार सुधीर तांबे यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kapil Sibal on Supreme Court: सर्वोच्च न्यायालयावरच प्रश्नचिन्ह! कपिल सिब्बल स्पष्टच बोलले; "आता कोर्टात जाण्यात अर्थ नाही, विश्वास उडाला!"

Maharashtra Live News : पंतप्रधान मोदींनी नवरात्रीनिमित्त दिल्या शुभेच्छा

YCM Hospital Incident : धक्कादायक ! पिंपरी-चिंचवडमध्ये धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण रस्त्यावर पडला; वायसीएम रुग्णालयातील प्रकार, VIDEO VIRAL

Navratri Festival : आदिमायेच्या उत्सवाला प्रारंभ;घटस्थापनेसाठी दुपारी दीड वाजेपर्यंत मुहूर्त

Tuljabhavani Temple: तुळजापूरला नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण ;तुळजाभवानी मातेच्या मंदिरात आज घटस्थापना

SCROLL FOR NEXT