Sugar production esakal
नाशिक

Sugar Production : उतारा कमी असल्याने यंदा राज्यात साखर उत्पादनात घट!

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव (जि. नाशिक) : राज्यात साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. मार्चअखेर २१० पैकी १६६ कारखान्यांचा हंगाम बंद झाला. अजून ४४ कारखाने सुरू आहेत.

गेल्या वर्षाच्या तुलनेत उसाचे व गळीत हंगाम सुरू करणाऱ्या कारखान्यांची संख्या वाढूनही यंदा साखर उताऱ्यामुळे उत्पन्नात घट होणार आहे. (sugar production in state decreased due to less harvest nashik news)

गेल्या वर्षी राज्याचा सरासरी साखर उतारा १०.४० होता. या वर्षी तो आतापर्यंत ९.९६ एवढाच आहे. यंदा अतिवृष्टीने उसाचे नुकसान झाले. मोठ्या प्रमाणावर रसवंतीगृह सुरू आहेत. गुळाचे कारखाने, तसेच कच्चा ऊस चारा म्हणून खरेदी केला जात असल्याने शिल्लक उसाचा प्रश्‍न भेडसावण्याची शक्यता धूसर आहे.

दरम्यान, नाशिक जिल्हा ऊस व साखर उत्पादनात दिवसेंदिवस पिछाडीवर पडत आहे. राज्यातील आठ विभागांतील १०६ सहकारी व १०४ खासगी, असे एकूण २१० साखर कारखाने यंदा सुरू झाले.

मार्चअखेर एक हजार ४५ लाख टन उसाचे गाळप होऊन एक हजार ४१ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेण्यात आले. गेल्या वर्षी १९८ साखर कारखाने सुरू होते. गळीत हंगाम सुरू करणाऱ्या साखर कारखान्यांची संख्या या वर्षी १२ ने वाढली.

राज्यात कोल्हापूर विभागाचा सर्वांत जास्त ११.४३, तर त्या खालोखाल पुणे १०.१० व नांदेड १०.०२ साखर उतारा आहे. सर्वांत कमी नागपूर ७.२०, सोलापूर ८.९४, छत्रपती संभाजीनगर ९.२६, अमरावती ९.५४, नगर ९.६५ एवढा साखर उतारा राहिला.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

कच्चा ऊस गाळल्यामुळे साखर उताऱ्यात घट झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. यंदा जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच राज्यात सर्वत्र रसवंतीगृहे सुरू झाली. रसवंतीगृहांत पाच ते सहा हजार रुपये टन भाव मिळत असून, रोख पैसे मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल रसवंतीगृहांना ऊस विक्रीकडे राहिला.

काही शेतकऱ्यांनी कच्चा ऊस चारा म्हणून बाजारात विक्रीस प्राधान्य दिले. पावसाळा सुरू होण्यास दोन महिन्यांचा अवधी आहे. त्यामुळे गेल्या वर्षासारखा शिल्लक उसाचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता दिसत नाही.

"नाशिक जिल्ह्यातील कारखान्यांची गाळप क्षमता पाहता ऊस उत्पादकांना उचित न्याय मिळत नाही. जिल्ह्यात नऊपैकी केवळ दोनच कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. जिल्ह्यात किमान ४० लाख टन ऊस उत्पादित होऊ शकतो. परंतु कारखान्यांची परिस्थिती चांगली नसल्याने शेतकरी उसाचे उत्पादन घेण्यासाठी पुढे येत नाहीत. राज्यात साखर उद्योगात आगामी वर्षात उत्पादनाची हीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे."

-कुबेर जाधव, समन्वयक, स्वाभिमानी शेतकरी संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT