female suicide.jpg 
नाशिक

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्याची आत्महत्या; कामगार वर्गात चर्चेला उधाण

सकाळवृत्तसेवा

नाशिक : शनिवारी (ता. 10) सकाळी पंचवटी येथे धक्कादायक घटना घडली. एसटी महामंडळाच्या नाशिक 1 आगारात हेल्पर म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने गळफास घेत आत्महत्या केली. अवघे 223 रुपये इतके वेतन मिळाल्याने आत्महत्या केली असल्याची चर्चा आहे. वाचा काय घडले?

अशी आहे घटना

शनिवारी (ता. 10) सकाळी पंचवटीतील कोणार्कनगर येथे खळबळजनक घटना घडली. एसटी महामंडळाच्या नाशिक 1 आगारात हेल्पर म्हणून काम करणाऱ्या अशोक ताडकुळे (वय 30) याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ताडकुळे हा मुळचा नांदेड येथील रहिवासी होता. किनवट येथील रहिवासी असून 2015 मध्ये तो महामंडळात रूजू झाला होता. एसटीतील आपल्या एका मित्रासमवेत तो कोणार्कनगर येथे भाडेतत्वावर राहत होता. त्याचा मित्र रात्रपाळी करुन रुमवर परतल्यावर अशोक गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला. ही घटना कामगारांना कळल्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. 

अवघे 223 वेतन झाल्याने आत्महत्या?

नोकरीसाठी अशोक हा कुटूंबाला सोडून नाशिकमध्ये राहत होता. कुटूंबात तो एकमेव कमावता असल्याने त्याच्यावरच सर्व जबाबदारी होती. जुलै महिन्यातील सुट्या शिल्लक नसल्यामुळे अवघे 223 रुपये इतके वेतन त्याला मिळाले. या घटनेमुळे अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. त्यातच केवळ 223 रुपये इतका पगार हाती आल्याने नैराश्यातून त्याने आत्महत्या केली असावी अशी चर्चा कामगार वर्गात सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission Controversy : 'ज्ञानेश कुमारांनी लोकसभेसह यापूर्वीच्या अनेक विधानसभा निवडणुकांत हेराफेरी केली'; राहुल गांधींचा गंभीर आरोप, मोदी-शाहांवरही निशाणा

Mumbai Rain: परतीचा पाऊस मुंबईला झोडपणार! 'या' भागात वादळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा नवा अंदाज

2007 T20 World Cup जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंना BCCI ने किती रुपये बक्षीस दिलेलं; युवराजलाही ६ सिक्ससाठी मिळालेलं खास बक्षीस

Latest Marathi News Live Update : मतचोरी करून खासदार झालेले कायदा बनवतायत : राहुल गांधी

Heart Health: हृदय निरोगी ठेवायचंय? कार्डिओलॉजिस्ट सांगतात २४ तासांचा सोपा रुटीन; काय खावं, किती व्यायाम करावा? सगळंच जाणून घ्या

SCROLL FOR NEXT